नदी प्रदूषणमुक्तीसाठी प्राधिकरण स्थापन करण्याची खासदार धैर्यशील माने यांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल

रुकडी - कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यात बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी निधीसह पंचगंगा नदीसाठी स्वतंत्र अधिकार असलेले प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झाली. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार उल्हास पाटील, राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते. 
दरम्यान, जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दूषित झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी आणि परिसरातील गावांत, तसेच शिरोळ तालुक्‍यात प्रदूषित पाण्याची तीव्रता सर्वाधिक आहे. पंचगंगा नदी प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी आवश्‍यक निधीसहीत पंचगंगा नदी स्वतंत्र अधिकार असलेले प्राधिकरण स्थापन करणे गरजेचे आहे. प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वतंत्र अधिकार असलेले प्राधिकरण स्थापन करून सहकार्य करण्याची विनंती खासदार माने यांनी केली. 

हे पण वाचा Video -कोल्हापूरच्या दूधगंगा उजव्या कालव्यात पडले गवे

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यासाठी पक्षाच्या माजी आमदारांना मुख्यमंत्री ठाकरे बळ देणार आहेत. 
- धैर्यशील माने, खासदार 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp dhairyasheel mane kolhapur cm uddhav thackeray