esakal | खासदार मंडलिक यांनी  मोबाईल कंपन्यांना  दिल्या 'या' सुचना

बोलून बातमी शोधा

MP Sanjay Mandlik warning mobile companies kolhapur marathi news}

   कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आदी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएल बरोबर इतर खाजगी दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या सेवा वारंवार खंडीत होत आहे.

kolhapur
खासदार मंडलिक यांनी  मोबाईल कंपन्यांना  दिल्या 'या' सुचना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  नागरीकांची बहुतांश कामे ही सध्या मोबाईलवरुनच होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागात अनेक ठिकाणी मोबाईलची सेवा खंडीत होत असल्याकारणाने नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोबाईल नेटवर्कसंदर्भात विभागवार भेटी देऊन ही समस्या सोडवावी अशी सूचना खासदार संजय मंडलिक यांनी  मोबाईल कंपन्यांना केली आहे.यासंदर्भात एक महिन्यापुर्वी खासदार संजय मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर विश्रामगृह येथे बैठक झाली होती. त्या बैठकीस अनुसरुन आज उजळाईवाडी विमानतळ कोल्हापूर येथे बैठक झाली. बैठकीला बीएसएनएल सह जीओ,  एअरटेल या खाजगी कंपन्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.  


    कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आदी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएल बरोबर इतर खाजगी दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या सेवा वारंवार खंडीत होत आहे. दुरध्वनी ग्राहकांकडून नेटवर्क न मिळणे,  इंटरनेटला स्पीड नसणे अशा वारंवार तक्रारी येत आहेत. अनेक वेळा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने खासदार संजय मंडलिक यांनी दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची एक महिन्यापुर्वी बैठक शासकीय विश्रामगृ कोल्हापूर येथे बोलावली होती. त्या बैठकीचा आढावा पहिल्यांदा आज झालेल्या बैठकीच्या वेळी घेण्यात आला. 

हेही वाचा- डोंगराच्या पायथ्याशी असणारे  सर्व रस्ते बंद : इतिहासात प्रथमच जोतिबावर खेटे भाविकांविना


चंदगड तालुक्यातील के फोर्ट व दुर्गमानवाड येथील टॅावर आता व्यवस्थितरित्या सुरु असल्याची माहिती बीएसएनल विभागाकडून देण्यात आली.  अजुनही याबाबत तक्रारी येत असल्याकारणाने खासदार संजय मंडलिक यांनी  ग्रामीण भागात नेमक्या काय समस्या आहेत हे समजून घेवून ही सेवा सुरळीत सुरु राहण्यासाठी मोबाईल कंपनींच्या प्रतिनीधींनी विभागावर भेटी देणेबाबतच्या सुचना या बैठकीवेळी दिल्या. 


 यावेळी याबैठकीस खासदार संजय मंडलिक यांचेसह आम.प्रकाश आबिटकर, मुरगूड नगरपालीकेचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, गडहिंग्लज नगरपालीकेचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, गगनबावडा पंचायत समिती  माजी सभापती ब्यंकट थोडगे,  अभिजीत तायशेटे, कल्याण निकम, ॲड. सुरेश कुराडे, यांचेसह बीएसएनल विभागाचे उपमुख्य महाप्रबंधक शिवराम कुलकर्णी, सुधाकर भिसे, एच.एन. देसाई, जीओ रणजित काटकर, एअरटेलचे प्रतिनीधी आणि दुर्गगनावड, दाजीपुर भागातील नागरीक उपस्थित होते.  

संपादन- अर्चना बनगे