त्याला आला हा 'संशय' आणि त्याने केला ; दानोळीत एकाचा निर्घृण खूण....

Murder In Kolhapur jaysingpur Kolhapur Marathi News
Murder In Kolhapur jaysingpur Kolhapur Marathi News

जयसिंगपूर (कोल्हापूर ) : गुटख्याची पोती चोरल्याच्या संशयावरुन एकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले असून शॉक देऊन, चटणीचे पाणी जखमांवर टाकून लाकडी दांडके, हॉकी स्टिकने मारहाण करत ही हत्या करण्यात आली. दानोळी (ता. शिरोळ) येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून अर्जुन (पूर्ण नाव नाही, रा. खटीरवा स्टुडिओ, नंदिनी लेवेट तहसिल, जि. बेंगलोर) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जयसिंगपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे मृतदेहासह आरोपी जेरबंद झाले. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कोल्हापूर-सांगली महामार्गावरील अंकली टोल नाक्‍यावर नाकाबंदी करुन कंटेनरसह दोन चार चाकी गाड्या ताब्यात घेतल्या.शेख जुबेर अहमद (वय 32, रा.निलमगळा, जि.बेंगलोर), इम्रान अल्ताफपाशा (वय 32), चिकबाना वारा (जि.बेंगलोर), असलम अली उस्मान अली (वय 38, शतरंजीपुरा., नागपूर), भरतेश सिध्द्राम कुडचे (वय 34, रा.नदीवेस, जि.सांगली),

महंमद जुनैद अब्दुल गब्बर दिवान (वय 43, रा.इतारावी, नागपूर) रणजित प्रकाश मिसाळ (वय 32, रा.नदीवेस मिरज) या सहा जणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केले आहे तर तर साजिद पाटनी (मुळ गांव मुंबई, सध्या रा.मिरज), महेश बजरंग दळवी (रा.दानोळी, ता.शिरोळ), अभिनंदन राजकुमार धडेल (रा.कोथळी, ता.शिरोळ), समीर पट्टेकरी (रा.इचलकरंजी)यांच्यासह दोन ते चार अनोळखी इसम फरारी आहेत. यातील दळवी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

 जखमांवर चटणी व पेट्रोल टाकून मारहाण

विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या गुटखा चोरल्याच्या संशयातून हा प्रकार घडला. दानोळी येथील निमशिरगांव-दानोळी मार्गावर असलेल्या दळवी फार्म हाऊसवर मंगळवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला.. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, चॉंदपाशा सन्नाऊल्ला (वय 23, रा.बिल्लानगर, ता.निलमगळा, जि.बेंगलोर, कर्नाटक) व नृसिंहमुर्ती (रा.ठुमकूर, ता.निलमगळा, जि.बेंगलोर) हे दाघे कर्नाटकातून एका कंटेनरमधून 18 जानेवारी रोजी 144 बॅग अथणी (जि.बेळगांव) येथे घेवून जात होते. अथणी येथे 20 जानेवारी रोजी कंटेनर पोहोचल्यानंतर यात बॅगा नसल्याचे स्पष्ट झाले.

 पुरावा नष्ट करण्यासाठी धडपड

यावेळी नृसिंहमूर्ती व त्याचा मित्र अर्जुन यांनी चोरी केल्याचा संशय घेवून त्यांना अथणी येथे मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना दानोळीतील महेश बजरंग दळवी यांच्या फार्महाऊसवर अपहरण करुन आणण्यात आले. याठिकाणी दोघांना चटणीचे पाणी पाजून, इलेक्‍ट्रीक बॅटरीचा शॉक, हॉकिस्टीक व केबलने मारहाण, उघड्या शरीरावरील झालेल्या जखमांवर चटणी व पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आली. यात अर्जुनचा बुधवारी दुपारी मृत्यु झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी संगणमताने कटाची आखणी करुन दुसरा जखमी नृसिंहमुर्ती याला अमिष दाखवून गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यास सांगितले.

पोलिसांचा सापळ्या यशस्वी

त्याचा मृतदेह दानोळी येथून इनोव्हा कारमध्ये घालून अथणी येथील गोडाऊनमध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न करत असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात मृतदेह, संशयीत आरोपी व वाहने जप्त करण्यात आली. फरारी संशयीतांच्या शोधासाठी कोल्हापूर व इचलकरंजीच्या गुन्हे अन्वेषण पथकासह जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, उपनिरीक्षक पी.सी.वाघ, ए.बी.पाटील यांनी सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला. 


त्यागी खून प्रकरणातील संशयीताचा सहभाग 
जयसिंगपूर येथे काही वर्षापूर्वी झालेल्या भरत त्यागी खून प्रकरणातील संशयीत आरोपी महेश दळवी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असून त्याच्याच फार्म हाऊसवर हा प्रकार घडला आहे. 

जयसिंगपूर पोलिसांची तत्परता कौतुकास्पद 
खबऱ्यामार्फत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे आपल्या फौजफाट्यासह अंकली टोल नाक्‍यावर तातडीने दाखल झाले. यावेळी करण्यात आलेल्या नाकाबंदीत हा प्रकार उघडकीस आला. जयसिंगपूर पोलिसांच्या तत्परतेमुळेच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 


दानोळीत खळबळ 
रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश दळवी याच्या फार्म हाऊसवर मृत्युचे तांडव सुरु होते. अमानुष मारहाणीत एकाचा मृत्यु झाला. परस्पर प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरु असताना याचा मागमुसही दानोळी गावात नव्हता. बुधवारी सकाळनंतर याची वार्ता गावात पसरताच खळबळ उडाली. 

 आरोपींना पोलिस कोठडी
दानोळी येथील खून प्रकरणी अटकेत असलेल्या सहा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. रेडकर यांनी 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक सरकारी वकील राजेश मडके यांनी गुन्हा गंभीर असून अद्याप इतर आरोपींसह हत्यारे, गुन्ह्यात आणखी काहींचा सहभाग आहे का याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com