esakal | कोल्हापूर : सेनापती कापशीत आलेल्या त्या टस्कराची ओळख पटली ; नाव आलं समोर
sakal

बोलून बातमी शोधा

the name gives to a yesterday elephant in senapati kapshi kolhapur

या उत्स्फूर्त नामकरणामुळे कोणता हत्ती कोठे आहे, हे ओळखणे सुलभ झाल्याचे अधोरेखीत झाले. 

कोल्हापूर : सेनापती कापशीत आलेल्या त्या टस्कराची ओळख पटली ; नाव आलं समोर

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : चंदगड तालुक्‍यातील पाटणे जंगलात असलेले हत्तीचे ‘ते’ कुटुंब कोकणात उतरून महिना झाला. वन विभागाने हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींच्या कळपाला कुटुंबाची उपमा देत अण्णा, बारक्‍या, माय अशी नावे दिली. तोच कित्ता आता या जंगली भागात दृढ झाला. त्याचाच भाग म्हणून आजऱ्यातील एक हत्ती तमनाकवाडा, सेनापती कापशीत आला, तोच चाळोबा गणेश नावाने ओळखला गेला. या उत्स्फूर्त नामकरणामुळे कोणता हत्ती कोठे आहे, हे ओळखणे सुलभ झाल्याचे अधोरेखीत झाले. 

काही महिने आजऱ्याच्या चाळोबा जंगलातील टस्कर हत्ती गेल्या दोन दिवसांपासून कागल तालुक्‍यातील सेनापती कापशीत आला. त्या हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी वनक्षेत्रपाल सुधीर सोनवणे त्यांचे पथक येथे तैनात आहे. चंदगड आजऱ्यातील हत्तींची काही गुणवैशिष्ठ्ये नोंदविणारे प्रभारी वनक्षेत्रपाल दत्ता पाटीलही कापशीला आले. पाटील म्हणाले, की  चाळोबा गणेश नावाने आजऱ्याचा हत्ती ओळखला जातो. तो नर आहे. त्याचा एक सुळा अर्धवट आहे. त्याचे वावरक्षेत्र मोठे आहे. चंदगडपासून गगनबावड्यापर्यंत तो येऊन गेला आहे. सन २०१९- २० मध्ये आजरा तसेच चंदगडात त्याचा वावर होता.' 

हेही वाचा - ग्रामीण भागात घर बांधणीसाठी नवा नियम; ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा नागरिकांच्या फायद्याची -

चंदगड तालुक्‍यातील एक कळप यात प्रामुख्याने नर हत्ती (आण्णा), मादी (माय), बारक्‍या छोटू असे चौघांचे कुटूंब पाटण्यात गेली वर्षभर तळ ठोऊन होते. गेल्या महिन्यात जंगल डोंगर उतरून कोकणात गेले. एकूणच चंदगड, पाटणे, कानूर, पिळणी या भागात हत्तींचा वावर आहे. ऊस तोडणी पूर्ण झाली की, हत्ती स्थलांतरीत होतात, तेव्हा त्याला ओळखणे मुश्‍कील होते. त्या हत्तीच्या खानाखूना नावामुळे त्याची ओळख पटणे शक्‍य होते तसेच नावामुळे हत्ती विषयी लोकांच्या मनात हत्ती विषयी आत्मीयता निर्माण झाल्यास मानव हत्ती यांच्यातील संघर्ष कमी होईल अशी अपेक्षा आहे असेही पाटील यांनी सांगितले.

कापशीत आलेला चाळोबा गणेश हत्ती तंदुरूस्त व मोठा आहे. लोक उत्सुकेत पोटी गर्दी करतात  त्यामुळे तो इतरत्र धावत आहे. ऊसात लपतो आहे तो त्याच्या मार्गाने पून्हा जंगलाकडे जाईल पण लोकांनी त्याच्या मागे धावून त्याची दमछाक घडवू नये अशी अपेक्षा श्री पाटील यांनी व्यक्त केली.

संपादन - स्नेहल कदम