सनई, तुतारी, ढोल, ताशाच्या निनादात दख्खनचा राजा श्री . जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास प्रारंभ

निवास मोटे
Saturday, 17 October 2020

 जोतिबा देवाची आकर्षक महापूजा

जागर सोहळात मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे .

 जोतिबा डोंगर  (कोल्हापूर) : जोतिबाच्या नावानं चांगभलं जयघोषात श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर ता . (पन्हाळा ) येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात आज भक्तीमय व मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवास पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला .

 सनई, तुतारी, ढोल, ताशे,  चौघडे, शिंग या वाद्याच्या निनादात जोतिबाच्या मुख्य मंदिरात सकाळी घटस्थापनेचा विधी झाला . पहाटे पासूनच मंदिरात धार्मिक विधी सुरू झाले .  सकाळी आठ वाजता समस्त दहा गावकऱ्यांनी श्री जोतिबा देवाची बैठक सालंकृत पूजा बांधली . ही पूजा नागवेलीच्या पानांची सजवली होती . सकाळी साडेदहा वाजता जोतिबा मंदिरातील घटस्थापनेचा विधी झाल्यानंतर यमाईदेवी, तुकाई, भावकाई मंदिरात घटस्थापना विधीसाठी पुजारी ग्रामस्थ  देवसेवक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची कर्मचारी अधिक्षक महादेव दिंडे व  सर्व लवाजमा  गेला .या ठिकाणी सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर  धुपारती सोहळा झाला .

हेही वाचा- नवरात्रोत्सव : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अशी असणार नऊ दिवस नऊ रूपांतील उत्सवकाळातील पूजा -

आरती मुख्य मंदिरात जाताना प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली . जोतिबा देवाचा जागर सोहळा २३ आक्‍टोबरला (येत्या शुक्रवारी ) होत असून या दिवशी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे . रात्रभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतील 
डोंगरावर यंदा प्रथमच देवस्थान समितीने आधुनिक पद्धतीची विद्यूत रोषणाई केल्याने डोंगर परिसर उजळून निघाला आहे .

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri celebrations begin on Jyotiba temple