देशसेवा करणारे फाैजी द्राक्ष बागेतच झाले क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

त्यांनी आपण स्वतः क्वारंटाईन होण्याचं ठरवलं आणि त्यांनी स्वतः द्राक्ष बागेमध्ये क्वारंटाईन झाले.

झरे(जि. सांगली) - विभुतवाडी (ता.आटपाडी) येथील एनडीआरएफच्या माध्यमातून देशसेवा करणारे काकासाहेब दादा पावणे यांना एक महिन्याची रजा मिळाल्याने ते गावाकडे आले आहेत.

सुट्टीवर निघाल्यापासून सरपंच चंद्रकांत पाहुणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गावची परिस्थिती काय आहे? याची माहिती घेतली व त्यानंतर त्यांनी आपण स्वतः क्वारंटाईन होण्याचं ठरवलं आणि त्यांनी स्वतः द्राक्ष बागेमध्ये क्वारंटाईन झाले.

सरपंच चंद्रकांत पाहुणे यांनी आरोग्य विभागाला याची माहिती दिल्यानंतर आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी येऊन त्यांची तपासणी केली व क्वारंटाईन शिक्का मारला. 

हे पण वाचा - कोकण - कर्नाटकी आंब्यांची दरात अशी चाललीय टक्कर... 

याबाबत बोलताना काकासाहेब पावणे म्हणाले, आपल्यामुळे गावातील कोणालाही त्रास नको, त्यामुळे मी आल्यानंतर गावात कुठेही न जाता एका द्राक्ष बागेमध्ये  निवांत राहिलो व याची कल्पना गावातील सरपंचांना दिली. त्यांनी आरोग्य विभागाला कळवून तपासणी करून क्वारंटाईन शिक्का मारला आहे. मला सध्या गावात राहण्यापेक्षा  द्राक्ष बागेमध्ये निवांत वाटत आहे. त्यामुळे मी क्वारंटाईन  होण्यासाठी द्राक्षबाग निवडली.

हे पण वाचा - काय आहे गोडबंगाल? खर्च पंचायतींचा अन्‌ मलई कंत्राटदारांना; खासगीत स्वस्त, सरकारी महाग
 

एनडीआरएपमध्ये भरती होऊन जवळपास १५ वर्षे झाली. काम आणि संसार यामुळे निवांत क्षण मिळत नसे. त्यामुळे आता द्राक्ष बागेत क्वारंटाईन होण्याचे ठरविले. 
-काका पावणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDRF soldier quarantine in grapes garden