काय आहे गोडबंगाल? खर्च पंचायतींचा अन्‌ मलई कंत्राटदारांना; खासगीत स्वस्त, सरकारी महाग

water rate increase in belgaum
water rate increase in belgaum

चिक्कोडी : पाणी ग्रामपंचायतीचे, वीज बिल ग्रामपंचायत भरणार, देखभाल पंचायतीकडे असे असतानाही ग्रामीण पाणीपुरवठा व नैर्मल्य खात्याकडून या शुद्ध पाणीपुरवठा केंद्रांच्या देखभालीची जबाबदारी खासगी एजन्सीकडे देण्यात येत आहे. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठ्याच्या नावाखाली प्रतिलिटर पाणीपट्टीत दीडपट दरवाढ केली आहे. राज्यात १८ हजार ५८२ जलशुद्धीकरण प्रकल्पांना मंजुरी आहे. यापैकी १६ हजार ५२८ प्रकल्पांची स्थापना केली आहे. २०५४ प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. 

खासगीत स्वस्त, सरकारी पाणी महाग
सहकारी संस्थांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्याकडून सरकारी मदतीचा निधी घेतला जात नाही. कूपनलिका अथवा विहिरीचे पाणी, पाईपलाईन, जागा, वीज, गुंतवणूक, देखभाल कर्मचाऱ्यांचे वेतन हा सर्व खर्च असूनही केवळ दहा पैशाला एक लिटर याप्रमाणे दोन रुपयांना २० लिटर पाण्याचा पुरवठा होतो. सरकारी जलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी ग्रामपंचायती अथवा पालिकेतर्फे नळाच्या पाण्याची सोय होते. नदीतून पाणी उपसा, विजेचा खर्च, पाईपलाईन हा खर्च ठेकेदारांना अजिबात नसतो. गावात शुद्धीकरण केंद्रासाठी जागाही दिली जाते. देखभालीसाठी कर्मचारीही दिला जातो. छोट्या-मोठ्या दुरुस्ती स्थानिक पातळीवरच होतात. ठेकेदार इकडे फिरकतही नाहीत, तरीही केंद्रातून देण्यात येणाऱ्या पाण्याचे भाव वाढविले आहेत.

   चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातील प्रकल्प 
  एकूण प्रकल्प : ७९ 
  कार्यरत प्रकल्प : ७१ 
  दुरुस्ती असलेले प्रकल्प : ५ 
  अपूर्ण असलेले प्रकल्प : ३ 
  खासगी प्रकल्प ः ५
  रायबाग मतदारसंघातील प्रकल्प
  एकूण प्रकल्प  : ४०           कार्यरत प्रकल्प  : ३६
  नादुरुस्त प्रकल्प : ४           खासगी प्रकल्प ः १

  निपाणी मदारसंघातील प्रकल्प
 एकूण प्रकल्प : ६६
 कार्यरत प्रकल्प  : ५९
 नादुरुस्त प्रकल्प : ४
 अपूर्ण प्रकल्प : ३
 खासगी प्रकल्प ः ६

   ठेकेदाराचा फायदा
  सध्या वीस लिटर पाणी केवळ दोन रुपयात.    प्रतिलिटर पाणी २५ पैसे दराने देणार
  दोन रुपयांना वीस लिटर मिळणारे पाणी पाच रुपये   पहिल्या व दुसऱ्या वर्षी प्रतिलिटर २५ पैसे दराने पाणी
  तिसऱ्या व चौथ्या वर्षी प्रतिलिटर ३० पैसे दराने पाणी   पाचव्या वर्षी प्रतिलिटर ३५ पैसे दराने मिळणार पाणी
  दरवाढ करूनही ठेकेदारांना प्रतिप्रकल्प तीन हजार   स्मार्ट कार्ड मशीनसाठी प्रतिकेंद्र पंधरा हजार


गतवर्षी महापुरात कल्लोळमधील जलशुद्धीकरण केंद्र बुडाले होते. तेथील उपकरणांची दुरुस्ती करताना जुन्या प्रकल्पाचे साहित्य आणून तात्पुरती दुरुस्ती केली. काही दिवसांतच प्रकल्प पुन्हा बंद पडला. देखभालीचे कंत्राट घेणाऱ्यांकडून शुद्धीकरण केंद्राकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या प्रकल्पांची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवर द्यावी. महापुराच्या काळात फटका बसलेल्या गावांत जलशुद्धीकरण केंद्रातून सतत मोफत पाणी पुरवावे.
- रवी मिरजे, तालुका पंचायत सदस्य, कल्लोळ

पूरग्रस्त भाग तसेच चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघातील सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प तातडीने सुरू करावेत. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. इच्छुक ग्रामपंचायतींना केंद्रांच्या देखभालीची जबाबदारी द्यावी, यासाठी ग्रामपंचायतीने लेखी मागणी अर्ज करावा.
- प्रकाश हुक्केरी, माजी खासदार

सरकारी जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी दरवाढीचा आदेश ८ मार्च २०१९ रोजी आला आहे. त्यानुसार ठेकेदार नियुक्त केले आहेत. पूर्वी दहा पैसे प्रतिलिटर पाण्याचे शुल्क वाढवून २५ ते ३५ पैसे प्रतिलिटर केले आहे. चिक्कोडी, निपाणी तालुक्‍यांतील केवळ १९ केंद्रांची दुरुस्ती व कामे अपूर्ण आहेत. १८५ पैकी १६६ प्रकल्प कार्यरत आहेत.
-आनंद बणगार, ग्रामीण पाणीपुरवठा खाते अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com