कुत्र्यांना सहज पकडण्याचे नेपाळी तंत्र 

Nepali technique for catching dogs
Nepali technique for catching dogs

कोल्हापूर - कोणत्यातरी आडवाटेवर पाच-सहा कुत्र्यांचा कळप भुंकत एकदम अंगावर आला की, भल्याभल्यांचा थरकाप उडतो. अशा मोकाट कुत्र्यांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यासाठी कुत्र्यांना पकडण्याचे जोखमीचे काम करण्यासाठी मानव खेत्री व संदीप थुई हे दोन नेपाळी तरुण कोल्हापुरात काम करीत आहेत. 

ज्या भागात मोकाट कुत्री आहेत. त्या भागात जाऊन मानव खेत्री कुत्र्याला विशिष्ट इशाऱ्याव्दारे जवळ बोलवतो. अवघ्या काही क्षणात कुत्र्यांचे मागील दोन पाय पकडतो. त्या क्षणी कुत्र्याला उचलून हवेत गोल फिरवतो. तेव्हा कुत्र्याला ग्लानी येते. त्याच वेळी संदीप थुई त्या कुत्र्यावर जाळी टाकतो, असे जाळीत घातलेली कुत्रे गाडीतून घालून आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये आणले जाते. दिवसाला 10 ते 15 कुत्री पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना कुत्र्यांनाही खाद्य देऊन त्यांची प्रकृती सुधारली जाते. त्यानंतर त्यांना पुन्हा सुरक्षितपणे जिथून आणले तिथे सोडले जाते. 

काही भटकी कुत्री आजारी, जखमी अवस्थेत रस्त्याकडेला पडून राहतात. त्यातून संसर्गजन्य आजार यांना होऊ शकतो, अशा कुत्र्यांवर उपचार व शस्त्रक्रिया करून त्यांना सुरक्षित करण्याचे काम ट्रस्ट व महापालिकेतर्फे होते. 

रस्त्यावरील आजारी, भटकी मोकाट हिंडणाऱ्या कुत्र्यांचा निर्बीजीकरणाचे काम महापालिका जीवरक्षा ऍनिमल ट्रस्ट यांच्या वतीने सुरू आहे. त्यासाठी शहरातील विविध भागांतील कुत्री काळजीपूर्वक पकडणे, त्यांच्यावर निर्बीजीकरणची शस्त्रक्रिया करणे तीन दिवसांनंतर जिथून पकडले, त्या भागात पुन्हा सोडणे, असे काम सुरू आहे. 

मोकाट कुत्र्यांचा कळप केव्हाही कोणावरही हल्ला करू शकतो. या कुत्र्यांना पकडणे तसे सोपे काम नाही, त्यामुळे स्थानिक स्तरावर कुत्रे पकडण्यासाठी माणसे सहज मिळत नाहीत. अशा स्थितीत नेपाळ भागातून आलेल्या मानव व संदीप या दोघांना येथे मोकाट कुत्री पकडण्याचे काम ट्रस्टकडून दिले आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून हे काम उभे राहिले आहे, अशी माहिती ट्रस्टच्या पदाधिकारी कल्पना भाटिया यांनी दिली. 

विविध शहरांत डॉग कॅचिंग 
डॉग कॅचर मानव खेत्री म्हणाले, ""यापूर्वी गुजरात, केरळ, दिल्ली या राज्यांतील अनेक शहरांतील आमच्या मोठ्या सहकाऱ्यांसोबत डॉग कॅचिंगचे काम केले आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूरला आम्ही आलो आहोत. सरावानुसार आम्ही येथेही कुत्रे पकडतो. उपचारानंतर सोडतोही. अनेकदा कुत्र्यांना कोणी दगड मारते, सतत हुसकावते, खायला मिळत नाही, दूषित पाणी प्यावे लागते. तेव्हा कुत्री आक्रमक होतात. अशी कुत्री चावतात, असे आम्हाला जाणवते. पूर्व खबरदारीचा भाग म्हणून आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांकडून आम्ही आमची तपासणी व उपचारही घेतो.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com