बेळगाव : कुडचीत 'त्या' मृताच्या कुटुंबातील ७ जणांना कोरोनाची बाधा

new 20 corona positive patient in belgaum kudchi
new 20 corona positive patient in belgaum kudchi

रायबाग : आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या अहवालानुसार रायबाग तालुक्यात आज (ता. ७) 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात कुडची येथे कोरोना बाधित मृताच्या कुटुंबातील सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच  खळबळ उडाली आहे.

रायबाग तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पण रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात कुडची येथून कोरोनाची बाधा होण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर हे शहर हॉटस्पॉट बनले होते. मात्र प्रशासन, आरोग्य, पोलिस खाते व नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधत कोरोनावर यशस्वीपणे मात केली. परिणामी कुडची कोरोना मुक्त झाली होती. मात्र राज्यात अनलॉकची अंमलबजावणी झाल्यापासून येथील रुग्ण संख्या हळूहळू वाढत आहे. 

कुडची येथे आज तब्बल नऊ रुग्ण सापडले आहेत. त्यात कोरोनामुळे मृत झालेल्या एकाच्या कुटुंबातील सात जणांचा समावेश आहे. तसेच शहरातील अन्य दोघे बाधित निघाले आहेत. त्यामुळे कुडची शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

रायबाग शहरात आज सहा तर तालुक्यातील भेंडवाड गावात एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे वाढणारी ही रुग्णसंख्या चिंताजनक वाटत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी बाधित रुग्णांच्या घराच्या  परिसरातील रस्ते सील केले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. 
नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी मास्क व सनिटायझरचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच संसर्ग झाल्याची लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य खात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

 
संपादन- धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com