ब्रेकिंग - कोल्हापूरात कोरोनाचा कहरच , आणखी २०० जणांना कोरोनाची बाधा...

शिवाजी यादव
Wednesday, 5 August 2020

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर आजही कायम

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर आजही कायम असून मध्यरात्री दोन वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकूण दोनशे व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचे दिसत असून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 8340 झाली आहे.

 एकूण 67 व्यक्ती गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर उर्वरित सर्वांची प्रकृती स्थिर आहे यातील जवळपास सत्तर टक्के व्यक्ती या ग्रामीण भागातील तालुकास्तरीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यातील गंभीर रुग्णांनवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसात जवळपास दोन हजारांहून अधिक स्वॅब तपासणीसाठी आले असून जवळपास साडे सहाशे व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज बारा वाजेपर्यंत सत्तावीस व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. 

हेही वाचा- जिल्हाधिकारी धावले अॅम्बुलन्स आणि पोलिसांसह

एकूण कोरोना बाधित  : 8340 
कोरोना वर उपचार घेणारे :  4680
आजवर एकूण कोरोना मुक्त      : 3449.
 एकूण कोरोना मयत :  217

हेही वाचा- कोल्हापूर बाजार समितीत अखेर सभापती, उपसभापतींचे राजीनामे... पुढे काय वाचा... -

तहसीलदारांसह वाहनचालक कोरोना बाधित
 तहसीलदार आणि त्यांचा वाहनचालक यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. दरम्यान, तालुक्‍यातील हसणे, ओलवण, दाजीपूर, पडळी, कारिवडे, कपिलेश्‍वर, गुडाळ आदी गावांतील ४५ लोक बाधित आढळले. पडळी आणि दाजीपूर येथे सर्वाधिक रुग्ण आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांनी दिली. राधानगरी तहसील सभागृहात कोल्हापूरहून आलेल्या एका उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनासंदर्भातच बैठक घेतली होती. संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांचा स्वॅब दोन दिवसांपूर्वी घेतला होता. त्यांनीच ही बैठक घेतली. त्याच रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे त्यांच्या संपर्कात असलेले तहसीलदार, नायब तहसीलदार व अन्य सहकाऱ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. दरम्यान, संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी राधानगरी येथे बैठक घेतलीच कशी, याची चौकशी व्हावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप कांबळे यांनी केली आहे.

हेही वाचा- दरड कोसळल्याची अफवा ...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांचा हेलपाटा, वाचा काय घडले चंदगड तालुक्‍यात -

केडीसीसी बॅंक अधिकारीही बाधित
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील एका अधिकाऱ्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित अधिकारी बॅंकेच्या मुख्यालयात कार्यरत असून, ते मूळचे कागल येथील आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 200 corona patient found in karvir kolhapur total count in 8340