esakal | कोल्हापुरात चोवीस तासांत 34 नवे कोरोना बाधित 

बोलून बातमी शोधा

new 24 corona patient in kolhapur}

नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात विविध खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या आत होती

कोल्हापुरात चोवीस तासांत 34 नवे कोरोना बाधित 
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर - जिल्हाभरात 24 तासात 34 व्यक्ती नव्या कोरोनाबाधित सापडल्या आहेत. तर 41 कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्हाभरात उपचार घेणाऱ्यांची संख्या 372 इतकी झाली आहे. तर शाहूवाडी तालुक्‍यातील 46 वर्षीय व्यक्तीचा सीपीआर मध्ये मृत्यू झाला. 

नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात विविध खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या आत होती. अशात प्रभावी उपचारातून अनेकजन कोरोना मुक्त होत होते. फेब्रुवारी महिन्यापासून मात्र बाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला 10 ते 48 इतके वाढले. तर कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण निम्म्या संख्येने घटले. त्यामुळे उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आजवर 372 पोहचली आहे. 

गेल्या पंधरा दिवसापूर्वी जे बाधित आले त्यांच्यावरही यशस्वी उपचार होत असल्याने आज एका दिवसात 41 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.तर रोज दहा ते 20 व्यक्ती कोरोनामुक्त होत असल्याने एकूण बाधितांची संख्या नियंत्रणात आहे. 

खबरदारीचा भाग म्हणून बहुतेक तालुकास्तरीय कोवीड सेंटरवर अद्यापि कोरोनास्वॅब तपासणी नियमीतपणे सुरू आहे. तर महापालिका आयसोलेशन रूग्णालयातून आजही पाचशेच्या संख्येने स्वॅब तपासणीसाठी पाठविले गेले एकूण जिल्हाभरातून 832 स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. 

 
एकूण कोरोना बाधित ः 50 हजार 634 
कोरोना मुक्त ः 48 हजार 516 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 746 
उपचार घेणारे ः 372 
 
 
  संपादन - धनाजी सुर्वे