esakal | कोल्हापुरात चोवीस तासात कोरोनाचे 40 नवीन रुग्ण 

बोलून बातमी शोधा

new 40 corona patients in kolhapur}

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला आहे

kolhapur
कोल्हापुरात चोवीस तासात कोरोनाचे 40 नवीन रुग्ण 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून गेल्या चोवीस तासात नवीन 40 कोरोना रुग्ण आढळले. तर, 13 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्त 319 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजअखेर 50 हजार 477 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 48 हजार 413 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला आहे. लोकांनी सॅनिटायझर व मास्क वापरणे बंधनकारक आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 40 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. आज सायंकाळी 5 पर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 136 चाचण्याचे अहवाल मिळाले. यापैकी 121 अहवाल निगेटिव्ह तर 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 7 अहवाल तपासण्यायोग्य नव्हते. त्यामुळे ते नाकारण्यात आले. ऍन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 75 अहवालापैकी 74 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासगी रुग्णालये व लॅबमधून 221 प्राप्त अहवालापैकी 190 निगेटिव्ह तर 31 पॉझीटिव्ह असे एकूण 40 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 477 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 413 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
  
  या ठिकाणी आढळले रुग्ण : 
भुदरगड-1, चंदगड-1, गडहिंग्लज-1, हातकणंगले-1, करवीर-3, पन्हाळा-1, शिरोळ-1, नगरपरिषद क्षेत्र- 2, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 27 व इतर जिल्हा व राज्यातील -2 असा समावेश आहे. 

हे पण वाचाशिवसेनेने ब्रम्हपुरीवरील काम बंद पाडले; संतप्त महिलांनी ठोकले टाळे

 आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या आजरा-893, भुदरगड- 1238, चंदगड- 1231, गडहिंग्लज- 1517, गगनबावडा- 154, हातकणंगले-5331, कागल-1685, करवीर-5744, पन्हाळा- 1873, राधानगरी-1254, शाहूवाडी-1364, शिरोळ- 2515, नगरपरिषद क्षेत्र-7528, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 674 असे एकूण 48 हजार 1 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 476 असे एकूण 50 हजार 477 रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे. यापैकी, 48 हजार 413 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 745 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 संपादन - धनाजी सुर्वे