ब्रेकिंग - कोल्हापूरमध्ये आज सकाळीच आणखी ६६ जण कोरोना बाधित...

new 66  corona positive cases in kolhapur total corona patient  Number two thousand 907
new 66 corona positive cases in kolhapur total corona patient Number two thousand 907
Updated on

कोल्हापूर: कोरोना पॉझिटिव्हच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली असताना आज सकाळीच नव्या ६६ जणांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत.त्यामुळे एकूण संख्यादोन हजार ९०७ झाली आहे. 

 आज पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये कोल्हापूर शहर 27, हातकणंगले 24, चंदगड दोन, पन्हाळा 2, करवीर आठ, गडहिंग्लज एक, यामध्य कोल्हापूर शहरातील रुग्णांचा अधिक समावेश आहे.

दरम्यान काल १८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या एक हजार ६८ झाली आहे. एक हजार ६६६ पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील १४ शासकीय कोविड सेंटरवर कोरोना तपासणी होत आहे. दोन दिवसांत एकूण ७२८ स्वॅबचे परीक्षण झाले. त्याचे अहवाल आज आले. यात २७९ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ३५४ व्यक्ती निगेटिव्ह आल्या.

सीपीआर कक्षातील डॉक्‍टर बाधित
सीपीआर रुग्णालयातील एक डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सीपीआरमध्येच उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यांनी कोरोना कक्षात उपचार सेवा केली आहे.

संपादन - अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com