कोल्हापुरकर 'दख्खनचा राजा' येताेय तुमच्या भेटीला

new marathi serial release on kolhapur dakkhancha raja jotiba in next month the process of shooting start in kolhapur
new marathi serial release on kolhapur dakkhancha raja jotiba in next month the process of shooting start in kolhapur

कोल्हापूर : दख्खनचा राजा ज्योतिबाला महाराष्ट्राचं लोकदैवत मानलं जाते. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त दख्खनच्या राजाला साकडं घालण्यासाठी येतात. ज्योतिबाचं महात्म्य सांगणारी एक मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होत आहे. गेली कित्येक महिने  कोरोनामुळे अनेकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आलेले नाही, मात्र आता या मालिकेच्या माध्यमातुन दर्शन घेता येणार आहे. 

निर्माते महेश कोठारे यांची दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका 23 ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील संपूर्ण शूटिंग कोल्हापूरमध्ये होणार आहे. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरु आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत दख्खनचा राजा ज्योतिबाच्या आयुष्यातील माहित नसलेले पैलु उघडणार असल्याची माहिती मिळाली आहे. मालिकेद्वारे मांडण्यात येणार भव्य सेट, टीम व दिग्दर्शन संतोष फुटाणे यांच्या सरकार्याने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे.

संशोधक आणि लेखक म्हणून परिचित असलेले डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे हे या मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार आहेत. महाराष्ट्रातील लोकदैवते हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव (राज्य मंत्री दर्जा) कोल्हापूर यांचं देखील या मालिकेसाठी मार्गदर्शन लाभत आहे. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com