कोल्हापूर: बोलोली लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

बोलोली येथे लोकनियुक्त सरपंचासह एकूण 12 सदस्यसंख्या आहे

सांगरुळ (कोल्हापूर)- बोलोली (ता. करवीर) येथील लोकनियुक्त सरपंच सदाशिव बापू बाटे यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी  तहसीलदार शीतल मुळे - भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी (दि.18)  ग्रामपंचायत सदस्यांची सभा बोलावली होती. या सभेत एकूण 12 सदस्यांपैकी 9 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणे गरजेचे असताना  8 सदस्य उपस्थित राहिल्याने केवळ एक मताअभावी हा अविश्वास ठराव बाळगल्याचे तहसीलदार मुळे - भामरे यांनी जाहीर केले. 

बोलोली येथे लोकनियुक्त सरपंचासह एकूण 12 सदस्यसंख्या आहे. यातील उपसरपंच सतीश बाटे, जगन्नाथ बाटे, अमर सुतार, सुनील कांबळे, छाया सुतार, सरसाबई कारंडे, आऊबाई शिपेकर, सुनंदा दुर्गुळे या आठ सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच सदाशिव बाटे यांच्यावर स्थायिकचे  राहण्यासाठी नसल्याने विकासकामांमध्ये अडचणी येत असल्याचे कारण देत 12 नोव्हेंबरला अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. 

तहसीलदार शीतलमुळे भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत एकूण सदस्य संख्येच्या किमान तीन तृतीयांश सदस्य (9 सदस्य) ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक होते. पण सरपंचांसह 3 सदस्य अनुपस्थित राहिल्याने व  केवळ 8 सदस्य उपस्थित राहिल्याने अविश्वास  ठराव नामंजूर करण्यात आला. 

हे पण वाचाकिती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम मात्र शिवसेनेवरच 

 

यावेळी  सर्कल सुहास गोदे, ग्रामसेवक एम.जी. पाटील, प्रवीण भोसले, तलाठी काटकर, पोलीस पाटील, गजानन शिंदे, सचिन पोवार आदी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no confidence motion was rejected against Bololi elected sarpanch