कोरोनामुळे आता गावचे उरूसही रद्द 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

शासनाने बरेच कार्यक्रम व बैठका पुढे ढकलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा माणगाव मधील शताब्दी महोत्सव रद्द केलेला आहे. त्यामुळे उरूस पूर्णता रद्द करावा फक्त दर्ग्या मधील पूजाअर्चा पाच मुजावर यांनी पूर्ण करावी आणि कोरोनाबाबतची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी.

कबनूर  - "संपूर्ण जगात कोरोना वायरस पसरत आहे. भारतात त्याची संख्या कमी असली तरी दक्षतेच्या दृष्टीने शासनाने सामुहिक कार्यक्रम रद्द केलेले आहेत. कबनूर उरुसात मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळे आरोग्याची खबरदारी म्हणून यावर्षीचा उरूस कोरोनाचे निर्मूलन होत नाही तोपर्यंत घेऊ नये."अशी सूचना प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी कबनूर उरुसानिमित्त बोलावण्यात आलेल्या बैठकीत दिली.

हे पण वाचा - मोठी बातमी : कोरोनामुळे बेळगावात घेतला मोठा निर्णय 

कबनूर उरुसाची माहिती सरपंच सुनील स्वामी, बबन केटकाळे, अल्ताफ मुजावर, दीलावर पटेल, बाळू कामत यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वरूप, पाण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, नैवेद्याची प्रथा इत्यादी माहिती प्रांताधिकार्‍यांनी घेतली. शासनाने बरेच कार्यक्रम व बैठका पुढे ढकलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा माणगाव मधील शताब्दी महोत्सव रद्द केलेला आहे. त्यामुळे उरूस पूर्णता रद्द करावा फक्त दर्ग्या मधील पूजाअर्चा पाच मुजावर यांनी पूर्ण करावी आणि कोरोनाबाबतची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी. त्याबाबतचे परिपत्रक आपण जाहीर करीत आहोत. असे प्रांताधिकारी विकास खरात यांनी सांगितले.

हे पण वाचा -  कर्नाटकातील त्या प्रकरणातील संशयितांचा न्यायालयात जामीनसाठी अर्ज... 

यावेळी हातकणंगले तहसीलदार प्रदीप उबाळे, शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे, अप्पर तहसीलदार मैनुद्दीन सनदे, नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड, आरोग्य विभागाचे डॉ. दीपक पाटील, पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे उपस्थित होते. यावेळी कबनूर ऊरुस कमिटीचे सरपंच सुनील स्वामी, उपसरपंच प्रदीप मणेरे, माजी पंचायत समिती सदस्य जयकुमार काडाप्पा, ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील, कुमार कांबळे, बलराम भोजने, बबन केटकाळे, अल्ताफ मुजावर, जयकुमार केटकाळे, बाळासो कामत, नजरुद्दीन मुजावर, कमाल मुजावर दीलावर पटेल, अमित चंदुरे, विजय देसाई, ओंकार सुतार उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून उरुस न भरविता उरुसा दिवशी फक्त धार्मिक विधी केला जाईल. ग्रामस्थांनी उरुसासाठी आपल्या नातेवाईकांना निमंत्रण देऊ नये. उरुसानिमित्त आयोजित केलेले मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

-सुनील स्वामी, सरपंच कबनूर ग्रामपंचायत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now village of Urus canceled Due to Corona