मोठी बातमी  : कोरोनामुळे बेळगावात घेतला मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

कोरोनामुळे शिक्षण खात्याने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. तसेच सोमवारपासून परीक्षा घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार पहिली ते सहावीपर्यंतच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सोमवारपासूनच परीक्षांना सुरुवात करण्यात आली होती तर विनाअनुदानित शाळांमध्ये मंगळवारपासून परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी शाळांमधील परीक्षा शनिवारपर्यंत पूर्ण होणार आहे

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात अद्याप कोणालाही कोरोनाची लागन झालेली नाही. तरीही खबरदारी म्हणून सोमवार (ता. 16) पासून पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. शुक्रवारी जिल्हा पंचायतीत अर्थ स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी कोरोनाबाबत चर्चा करण्यात आली व सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हे पण वाचा - Video : खरच त्या गाण्याने कोरोना जाणार का...?

कोरोनामुळे शिक्षण खात्याने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. तसेच सोमवारपासून परीक्षा घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार पहिली ते सहावीपर्यंतच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सोमवारपासूनच परीक्षांना सुरुवात करण्यात आली होती तर विनाअनुदानित शाळांमध्ये मंगळवारपासून परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी शाळांमधील परीक्षा शनिवारपर्यंत पूर्ण होणार आहे तर इतर शाळांना पेपर लवकर लवकर पूर्ण करावे लागणार आहेत.

हे पण वाचा - कर्नाटकातील त्या प्रकरणातील संशयितांचा न्यायालयात जामीनसाठी अर्ज... 

शनिवारी पेपर पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत कशा प्रकारे खबरदारी घ्यावी याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना सर्व शाळांना करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने फक्‍त पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच सुट्टी देण्यात आल्याचे स्पष्ट केले असून सातवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार आहेत. तसेच सुट्टी फक्‍त विद्यार्थ्यांना असणार आहे मात्र शिक्षकांना शाळेत यावे लागनार आहे. सध्या बारावीची वार्षिक परीक्षा सुरु आहे तर दहावीची परीक्षा 27 मार्चपासून सुरु होत आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करने आवश्‍यक आहे असे मत व्यक्‍त होत आहे. 

जिल्हा पंचायतीच्या बैठकीत कोरोनाबाबत चर्चा करण्यात आली असून परीक्षा पूर्ण होताच पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळांना माहिती देण्यात येणार आहे. 

-गजानन मन्नीकेरी, जिल्हा शिक्षणाधिकारी, चिक्‍कोडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: announces holiday to schools in Belgaum