वृद्ध खेळाडूंना मिळाले केवळ चार महिन्यांचे मानधन ; आठ महिन्यांच्या रकमेची प्रतीक्षाच

old age players remuneration for 4 months received in kolhapur
old age players remuneration for 4 months received in kolhapur
Updated on

कोल्हापूर : शासनाने वृद्ध खेळाडूंना केवळ चार महिन्यांचे मानधन देऊन तोंडाला पाने पुसली. उर्वरित आठ महिन्यांचे मानधन खेळाडूंच्या हाती पडलेले नाही. ते कधी मिळणार, याचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढत आहे. मानधन वेळेवर मिळण्यासाठी शासन ठोस निर्णय घेणार का, अशी विचारणा होत आहे.

हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी पैलवानांना सहा हजार, आंतरराष्ट्रीय चार, तर राष्ट्रीय खेळाडूंना अडीच हजार दिले जातात. खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही रक्कम तुटपुंजी असली तरी आजारपणासाठी ही रक्कम उपयोगाची ठरते. मानधनात वाढ करण्याचा मुद्दा पैलवानांनी वारंवार मंत्र्यांसमोर ठेवला. राज्यात भाजप सरकारची सत्ता असताना थेट मंत्र्यांसमोर मानधनवाढीचे गाऱ्हाणे मांडले.

सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनाही मानधनावाढीची आठवण करून दिली. त्यावर निर्णय 
झालेला नाही. गेल्या वर्षी मार्च ते जून २०२० पर्यंतचे थकलेले मानधन खेळाडूंना मिळाले. उर्वरित मानधन लवकरच मिळेल, अशी त्यांना आशा होती. नवे वर्ष उजाडले तरी आठ महिन्यांचे मानधन देण्याच्या हालचाली दिसून येत नाहीत. 

"आठ महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. ते कधी मिळणार, हे माहीत नाही. क्रीडा कार्यालयाकडून ते मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे."

 - शैलजा साळोखे, अर्जुन पुरस्कार विजेत्या

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Election 2026 Latest Update
PM Kisan 2026 Kolhapur farmers e-KYC Aadhaar bank linking
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com