नैराश्‍य, तणावातून विष घेण्याच्या प्रकारात वाढ ; समुपदेशनाची आवश्यकता

suicide attend with stress and depression cases increased in kolhapur
suicide attend with stress and depression cases increased in kolhapur

कोल्हापूर : खोकल्याचे औषध समजून नजरचुकीने विषाची बाटली तोंडाला लावली, अंधारात पाणी समजून कीटकनाशक प्यायलो, अशा घटनांचे रोज आठ ते दहा रुग्ण ‘सीपीआर’मध्ये दाखल होतात. बदनामी व कारवाईपासून वाचण्यासाठी काही जण या कारणाचा वापर करतात. अनेक दिवसांपासून यातील बहुतेक व्यक्ती मानसिक व नैराश्‍याने ग्रस्त असल्याचा धक्कादायक प्रकार मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचारात समोर येत आहे. 

विषप्राशन केलेल्या व्यक्तींना सर्रास शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. उपचारांनंतर अशी व्यक्ती स्थिरस्थावर होऊ लागते. 
पोलिसांना काय सांगायचे, याबाबत नातेवाईकांकडून चर्चा सुरू होते. यातील काही जणांची कारणे खरी असतात. मात्र, अनेक नातेवाईक बदनामी व कारवाई टाळण्यासाठी नजरचुकीचा आधार घेतात. असे रुग्ण स्थिर झाल्यावर त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जातात. यातील अनेक रुग्ण हे व्यसनाधीन, मानसिक तणावात व नैराश्‍याने ग्रासलेले असतात. त्यांचे वर्तन इतर सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे नसते.

चेहऱ्यावर उदासीपणा व एकटेपणा जाणवतो. नेमके कारण काय? हे शोधून संबंधित व्यक्तीचे समुपदेशन केले जाते.
त्या व्यक्तींत आत्मविश्‍वास निर्माण करून त्याला पुन्हा उभे करण्याचे काम ‘सीपीआर’मधील मानसोपचार विभाग करीत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीत अशा पद्धतीचे बदल दिसल्यास त्या व्यक्तीशी कसा संवाद साधावा?, त्याला कसे बोलते करून त्याच्यातील नैराश्‍यतेचे कारण जाणून घ्यावे, त्याला मानसिक आधार कसा द्यावा, हा आजार असून, डॉक्‍टरांची वेळीच मदत घ्या. याबाबत नातेवाईकांचे समुपदेशनही केले जाते. 

"नैराश्‍य, ताणतणाव, व्यसनाधिनता अशा कारणांतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढते. ही लक्षणे म्हणजे एक आजार असून, यावर वेळीच समुपदेशनासह उपचार होणे गरजेचे आहे. कुटुंबातील संवाद वाढल्यास असे प्रकार टाळता येतील."

- डॉ. पवन खोत, मानसोपचार विभागप्रमुख, ‘सीपीआर’

संपादन - स्नेहल कदम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com