
कोल्हापूर - कोरोनाची भीती सर्वत्र वाढत असतानाच शिवाजी पेठ मरगाई गल्लीतील बाबुराव अंबाजी जाधव(94) आणि विमल बाबुराव जाधव(88) या आजीआजोबांनी घरीच होमिओपॅथी उपचार घेउन अगदी नाममात्र खर्चातच कोरोनावर मात केली आहे. एका बाजुला लाखो रुपयांची दवाखान्याची बिले भरुनही उपचाराविषयी साशंकता उपस्थित केली जात असताना शिवाजी पेठेतल्या या आजी आजोबांचे उदाहरण लोकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी पुरेसे आहे. बाबुराव जाधव यांचा मुलगा डॉ. नंदकुमार जाधव यांनी कोल्हापूरातील ख्यातनाम होमओपॅथी डॉक्टर मोहन गुणे यांच्या सल्ल्यानुसार हा उपचार केला. विशेष म्हणजे जाधव परिवारातील पाच ते सहा सदस्य कोरोना पॉझिटीव्ह होते. या सर्वांच्यावर होमिओपॅथीने उपचार करण्यात आले.
कोरोनाचा कहर सर्वत्र वाढतच आहे. उपचारासाठी लोकांना धावाधाव करत आहे. सरकारी आणि खासगी दवाखानेही हाउसफुल्ल आहेत. लाखो रुपयांचे पॅकेज एका रुग्णापाठीमागे आकारले जात आहे. सरकारी यंत्रणेच्या सर्व हाताबाहेर गेले आहे. अशा स्थितीत कोरोना झाला तर करायचे काय? या धास्तीने अनेकांना झोप लागत नाही. जे रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. त्यांची हॉस्पीटलमिळविण्यासाठी धावपळ सुरु असते. रुग्ण आणि नातेवाईकांचेही यासाठी हाल होत आहेत. सर्वत्रच ही परिस्थिती असताना शिवाजी पेठ मरगाई गल्ली येथील बाबुराव जाधव हे चौऱ्यानव वर्षे वयाचे आजोबा आणि त्यांच्या पत्नी विमल या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या आजीबाई घरीच उपचार घेउन ठणठणीत झाल्या आहेत. 16 ऑगस्टपासून या आजीआजोबांना खोकला, थंडी, ताप, अंगदुखी असा त्रास होत होता. त्यांची तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. घरीच मुलगा डॉ. नंदकुमार यांनी होमिओपॅथी उपचार सुरु केले. डॉ.मोहन गुणे यांच्या सल्ल्याने हे उपचार घेतले. डॉ. नंदकुमार यांचे मोठे भाउ शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव जाधव यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्यावर देखील हा उपचार करण्यात आले. बघता बघता सर्वच कुटूंबात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने सर्वांच्यावरच घरीच उपचार करण्यात आले.
होमिओपॅथी पध्दतीने हे उपचार सुरु झाले. आठ ते दहा दिवसात आजीआजोबा खडखडीत झाले आहेत. आज तीन आठवडे झाले. आता या आजी आणि आजोबांना कोणताच त्रास नाही. इतर सदस्यांनाही होमिओपॅथी तसेच कांही प्रमाणात ऍलोपॅथीही उपचार करण्यात आले. महापालिकेच्या किटचाही कांही प्रमाणात वापर झाला.ऑक्सीमीटरमुळे मॉनिटर करता आले. कोरोनाची भिती सर्वत्र वाढत असताना या आजीआजोबांचे उदाहरण लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पुरेसे आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.