सावधान ! जुनी गाडी खरेदी करताय ?

old vehicle buy with the fine and all conditions in kolhapur police administration warns to people
old vehicle buy with the fine and all conditions in kolhapur police administration warns to people

कोल्हापूर : जुने वाहन कमी किमतीला मिळते म्हणून खरेदी करीत असाल, तर सावधान म्हणण्याची वेळ आली आहे. वाहतूक नियमांचा भंग केल्याचा दंड संबंधित वाहनांवर किती पेंडिंग आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. 

वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या वाढू लागली. वाहतुकीच्या कोंडीसह अपघाताचा प्रश्‍न गंभीर बनू लागला. जिल्ह्यातील सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिस प्रशासनाने आवश्‍यक ती पावले उचलण्यास सुरवात केली. कोल्हापूरसह जिल्ह्यातील प्रमुख शहरात वाहतुकीचे नियोजनासाठी सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, एकेरी मार्ग, पार्किंग झोन, सम-विषम पार्किंग अशा उपाययोजना केल्या आहेत; पण सध्या वाहतूक नियमांचा भंग करण्याचेच प्रमाण वाढू लागले आहे.

सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, एकेरी मार्गाचा भंग असे वाहतुकीचे भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. जे चालक कारवाईचा रोख स्वरूपात दंड भरू शकत नाहीत. त्यांच्या दंडाची रक्कम पेंडिंग म्हणून नोंद होते. 
देशावर सध्या कोरोनाचे संकट आहे. अशा काळात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या बहुसंख्य चालकांकडून आपल्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगितले जाते.

परिणामी हा दंड पेंडिंग पडतो. सध्या टपाल खात्यावरही मर्यादा येत असल्याने याच्या नोटिसाही संबंधित चालकांकडे पोहचण्यास उशीर होत आहे. पेंडिंग दंडाची रक्कम वाढल्याने अशी वाहनांची विक्री करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. स्वस्तात जुने वाहन मिळते म्हणून वाहन खरेदी केले गेले तर त्याचा पेंडिंग दंड नव्या मालकाच्या माथी पडतो. 

जानेवारी ते ऑगस्टअखेर कारवाई


कारवाई संख्या    -  ७९,१७७    

रोख वसूल दंड    -    १,६५,१४,२००

पेंडिंग दंडाची कारवाई    -  ४६,०८३  

पेंडिंग दंड  -  ९५,६६,३००


   

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com