जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

शिरोली एमआयडीसी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नागाव (कोल्हापूर) : जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अशोक नवनाथ जानराव (वय 57, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. मुलगा अमोल अशोक जानवार याच्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष अभिमान जानराव, सुधाकर अभिमान जानराव, पद्मिनी अभिमान जानराव व सुनिता सुधाकर जानराव (माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : जानवार कुटुंबीयात घराच्या जागेतील वाद आहे. याच वादातून शनिवारी (ता. 16) मारामारी झाली. संतोष, सुधाकर, पद्मिनी व सुनीता यांनी अमोल, अमोलचा भाऊ, आई व वडील अशोक यांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. यामध्ये अशोक जानवार यांच्या पोटावर तीव्र मार लागल्याने त्यांचा आतड्याला छिद्रे पडली. सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead kolhapur shiroli