गायत्री पटेलची 'वन ड्रीम वन राइड' ला कोल्हापुरातून सुरुवात

मतिन शेख
Saturday, 5 December 2020

एकतीस वर्षीय गायत्री व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. 2017 पासून गायत्रीने दुचाकीवरील प्रवासाला सुरुवात केली.

कोल्हापूर : बाईक रायडर गायत्री पटेलने कोल्हापुरातून आजपासून वन ड्रीम - वन राइड उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरुवात केली. टीव्हीएस अपाचे 200 आरटी या दुचाकीवरून पुढील सहा महिन्यात गायत्री तीस हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर या मोहिमेत पूर्ण करेल. माई टीव्हीएसमध्ये कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मोहिमेची सुरुवात झाली.

एकतीस वर्षीय गायत्री व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. 2017 पासून गायत्रीने दुचाकीवरील प्रवासाला सुरुवात केली. आज अखेर गायत्रीने देशाच्या वेगवेगळ्या भागात टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 या दुचाकीवरून 65 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. 

वन ड्रीम - वन राइड मोहिमेत गायत्री भारतातील २८  राज्यं, ८ केंद्रशासित प्रदेश आणि १८ जागतिक वारसा स्थळांना भेटी देणार आहे. मुंबई, सूरत, जयपूर, दिल्ली, स्पिती, श्रीनगर, आग्रा, कोलकाता, भोपाळ, हैदराबाद, चेन्नई, कोची, कोईमतूर, बंगळुरू या शहरांमधून गायत्रीची ही मोहीम जून 21 पर्यंत पूर्ण होईल.

हेही वाचा- पक्ष राहीले बाजूलाच अन्  कार्यकर्तेच भिडले -

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांनी गायत्री पटेलला सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. महिलांमध्ये प्रवासाची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक स्त्रियांनी अशा मोहिमा राबवाव्यात असे मनोगत गायत्री पटेलने व्यक्त केले.

यावेळी मोहन ऑटो इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे, संचालक दिग्विजय राजेभोसले, टीव्हीएस मोटर्सचे टेरिटरी मॅनेजर रोहित श्रीवास्तव, माई टिव्हीएसचे अनिल कांबळे व युवराज गायकवाड उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Dream One Ride start to kolhapur Beginning of the journey to India