one friend murdered to his friend for 2 kg gold and both area arrested from police in sangli miraj
one friend murdered to his friend for 2 kg gold and both area arrested from police in sangli miraj

दोन किलो सोन्यासाठी मित्रानेच केला मित्राचा घात

मिरज (सांगली) : उत्तर प्रदेशातील सराफी दुकानातून दोन किलो सोन्यासह रोख रकमेची चोरी करून आलेल्या सागर शहाजी पाटील (वय ३०, रा. पाटगाव ता. मिरज) याचा अथणी येथे खून केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एकास अटक केली असून मुरसिद्ध कोळेकर असे त्याचे नाव आहे. तर खुनातील अन्य एक आरग (ता. मिरज) येथील नवनाथ बापूसाहेब बाबर (वय ३०) यास सोने लुटल्या प्रकरणी आणि चोरीचे सोने विकत घेणारा झारखंड येथील प्रदीप पाटील या संशयितांना उत्तर प्रदेश पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

याप्रकरणी कर्नाटकातील अथणी पोलिस ठाण्यात सागर शहाजी पाटील याच्या खुनाचा, तर उत्तर प्रदेशात दोन किलो सोने आणि वीस लाख रुपयांची चोरी असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणातील संशयित नवनाथ बाबर हा तीन ऑक्‍टोबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलिसांत त्याच्या पत्नीने नोंद केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तीन ऑक्‍टोबर रोजी नवनाथ बापूसाहेब बाबर हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दाखल केली होती. याचा तपास मिरज ग्रामीण पोलिसांनी सुरू केला.

मात्र तत्पूर्वीच नवनाथ बाबर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी सोने चोरी प्रकरणी ताब्यात घेतले होते. २९ सप्टेंबरला या घटनेतील सागर शहाजी पाटील याचा मृतदेह अथणी पोलिसांना मिळाला. सागर पाटील याच्या खून प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी संशयित म्हणून (जंबगी ता. अथणी) येथील मुरसिद्ध कोळेकर याला अटक केली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील सोने चोरीचे प्रकरण समोर आले. गेल्या २० वर्षांपासून सागर पाटील हा त्याचा भाऊ संतोष पाटील यांच्या उत्तर प्रदेशातील चंदोली येथील सोने गाळण्याच्या दुकानात कामाला आहे.

संतोष पाटील यांच्याकडे चंदोली येथीलच रत्नदीप गोल्ड अँड डायमंड या दुकानातून काही सोन्याचे जुने दागिने गाळण्यासाठी आले होते. सागर पाटील याने संतोष पाटील यांच्याकडे गाळपासाठी आलेले सुमारे दोन किलो सोने आणि वीस लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन २७ सप्टेंबर रोजी पोबारा केला. सोने आणि रोख रक्कम घेऊन पळून आलेल्या सागर पाटील याने नवनाथ बाबर आणि मुरसिद्ध  कोळेकर या दोघांना नागज फाटा येथे बोलावून घेतले आणि ते तिघे अथणीला (कर्नाटक) गेले.

तेथे मूरसिद्ध कोळेकर आणि नवनाथ बाबर या दोघांनी सोने लुटण्याच्या उद्देशाने सागर पाटील यांचा  खून करून त्याचा मृतदेह अवखोड (ता. अथणी) येथे नदीत फेकला. या खूनाचा तपास करताना कर्नाटक पोलिसांनी  मुरसिद्ध कोळेकर याला जंबगी (ता. अथणी) येथून अटक केली. तर तत्पूर्वीच नवनाथ बाबर आणि चोरीचे सोने विकत घेणारा संशयित म्हणून झारखंड येथील प्रदीप पाटील याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

सोने विकत घेणाराही पकडला

चोरीचे सोने विकत घेणारा झारखंड येथील प्रदीप पाटील या संशयितालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com