esakal | राणी चन्नमा विद्यापीठाच्या इमारतीसाठी शंभर कोटी मंजूर 
sakal

बोलून बातमी शोधा

One hundred crore sanctioned for Rani Channama University building

विद्यापीठाच्या स्थापनेसाठी सध्या निश्‍चित करण्यात आलेल्या जागेवर यापूर्वी निश्‍चित करण्यात आलेली बहुग्राम पाणी योजना रद्द केली जाणार नाही.

राणी चन्नमा विद्यापीठाच्या इमारतीसाठी शंभर कोटी मंजूर 

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाची (आरसीयु) इमारत उभारण्यासाठी पहिल्या टप्यात शंभर कोटी अनुदान देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री डॉ. अश्‍वथनारायण यांनी शनिवारी (ता.24) दिली. आरसीयुचा दुसरा विभाग हिरेबागेवाडीत स्थापन करण्याचा निर्णय सरकारने अलीकडेच घेतला आहे. त्या जागेची शनिवारी (ता.24) त्यांनी पहाणी केली. 

आरसीयुसाठी 127 एक्कर जमीन अलिकडेच मंजूर करण्यात आली आहे. त्याठिकाणी ऍकॅडमीक व प्रशासकीय केंद्र ही दोन्ही कार्यालये कार्यरत राहतील. स्थनिक शेतकरी स्वच्छेने जागा देण्यास तयार झाले तरच ती खरेदी करण्यात येणार आहे. जागा देण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यावर दबाब आणण्यात येणार नाही. विद्यापीठाच्या प्रगतीच्या दृष्टीने स्वतःची कॅंम्पस एरीया असावी, अशी अनेक वर्षापासून मागणी होती. त्यामुळे हिरेबागेवाडी येथील जागेचा विचार करून विद्यापीठाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव शहरानजीक जागा मिळणे दुरापास्त झाल्याने जागा निवडण्यातच वेळ न घालवता, शिक्षणाची सोय लक्षात घेऊन हिरेबागेवाडी येथील जागा निश्‍चित करण्यात आली. आता विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांच्याच सहकार्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

विद्यापीठाच्या स्थापनेसाठी सध्या निश्‍चित करण्यात आलेल्या जागेवर यापूर्वी निश्‍चित करण्यात आलेली बहुग्राम पाणी योजना रद्द केली जाणार नाही. विद्यापीठाच्या विस्तारासाठी जागा निश्‍चित करताना कोणतेही राजकारण करण्यात आलेले नाही. विद्यापीठाचा संपूर्ण विकास घडवून आणण्यासाठी सरकार कटीबद्द आहे. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून ही जागा विद्यापीठासाठी मंजुर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या नुतन आवारात विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हे पण वाचा - करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा

या भागाच्या शैक्षणिक विकासासाठी विविध कोर्स सुरु करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हिरेबागेवाडी येथील नियोजित जागेत मल्लया अज्ज देवस्थान असून या मंदिराचा विकासही घडवून आणण्यात येईल असे आश्‍वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. हिरेबागेवाडी ग्रामस्थांनी विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्‍यक असणारी अतिरिक्त जमिन देण्यास तयार आहोत, असे आश्‍वासन दिले. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, कुलगुरु डॉ. रामचंद्रगौडा, कुलसचिव प्रा. बसवराज पद्मसाली, प्रा. एम. एस. हुरकडली, सिंडकेट सदस्य डॉ. आनंद होसूर, एच. एस. शिग्गाव, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे