कोल्हापूर - पन्हाळा रोडवर झालेल्या अपघातात पाटबंधारे विभागातील अधिकारी जागीच ठार

अभिजीत कुलकर्णी
Friday, 5 March 2021

कोल्हापूर - पन्हाळा रोडवरील आंबेवाडी जवळ आज सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला.

नागाव (कोल्हापूर) : आंबेवाडी ( ता. करवीर ) येथे मोटार आणि टेम्पोची समोसमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार झाले आहेत. पुलाची शिरोली (हातकणंगले ) येथील पाटबंधारे विभागाचे अधिकारी राहूलराज अनिल पाटील वय वर्षे ( वय ३२ ) असे त्यांचे नाव आहे. ते पाटबंधारे विभागात अधिकारी होते. कोल्हापूर - पन्हाळा रोडवरील आंबेवाडी जवळ आज सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला. राहूलराज पाटील हे कामानिमित्त सकाळी मोटारीने प्रवास करत पन्हाळ्याकडे निघाले होते. दरम्यान आंबेवाडी येथे मालवाहतूक टेंम्पोची कारला जोरदार धडक बसली. यामध्ये राहूलराज यांचा जागीच मृत्यू झाला.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात) 

हेही वाचा - सोहळे थांबले... दुग्धजन्य पदार्थांवर संकट -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one officer dead in kolhapur panhala highway in kolhapur