esakal | कोल्हापूर ; 'त्या' कंटेनरमधील आणखी एक जण कोरोना पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

one women corona positive who travel mumbai to karnataka in container

गेल्या चार दिवसांपूर्वी मुंबईहून कर्नाटक मधील हसनकडे जाणारा एक कंटेनर कोल्हापूर पोलिसांनी पकडला होता. त्या कंटेनरमधून २८ जण प्रवास करत होते. या सर्वांचे अहवाल मिरज येथील वैद्याकीय शाळेत पाठविण्यात आले होते.

कोल्हापूर ; 'त्या' कंटेनरमधील आणखी एक जण कोरोना पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर पोलिसांनी तीन दिवसापूर्वी मुंबईहून कर्नाटक मधील हसनकडे प्रवास करणाऱ्या कंटेनरला थांबवून त्या कंटेनरमधील प्रवाशांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यातील एकाचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला होता. त्याच कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या आणखी एका एका महिलेचा कोरोना अहवाल आज पाॅझिटिव्ह आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तीन दिवसांपूर्वी मुंबईहून कर्नाटक मधील हसनकडे जाणारा एक कंटेनर कोल्हापूर पोलिसांनी पकडला होता. त्या कंटेनरमधून २८ जण प्रवास करत होते. या सर्वांना ताब्यात घेहून त्यांचे अहवाल मिरज येथील वैद्याकीय शाळेत पाठविण्यात आले होते. काल त्यातील एकाचा स्वॅब पाॅझिटिव्ह आला होता तर त्याच प्रवाशांमधील एका महिलेचा स्वॅब आज पाॅझिटिव आला आहे. 

दरम्यान, कोल्हापूर पोलिसांच्या सर्तकतेमुळे पुढिल मोठा धोका टळला असून त्या कंटेनरमधील सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

हे पण वाचा - लॉकडाउननंतर सोने गुंतवणूक फायद्याचीच...!                                    

हे पण वाचा -  अरे व्वा!... कोरोनाच्या मंदीत शोधली संधी                                                    

हे पण वाचा -  बाप रे ः महिनाभर सहाजण एका खोलीतील बंदिस्त

go to top