online Eleventh admission process in kolhapur Process in two stages
online Eleventh admission process in kolhapur Process in two stages

या दिवसापासून सुरु होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया....

कोल्हापूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार ( ७) पासून सुरवात होणार आहे. यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून दोन भागांत अर्ज भरायचे आहेत. यातील पहिला टप्पा बुधवार ( १२) पर्यंत आहे. दुसरा टप्पा शुक्रवार (१४) ते रविवार (२३) या कालावधीत आहे. त्यानंतर पाच दिवसांत निवड यादी लागणार असून ती शनिवारी (२९) संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. 


ते म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची प्राथमिक माहिती भरावी. या अर्जात मोबाईल क्रमांकही भरायचा असून याच क्रमांकावर या प्रक्रियेची सर्व माहिती पाठवली जाणार आहे. 

याचवेळी विद्यार्थ्यांनी ८० रुपये शुल्क ऑनलाईन भरायचे आहे. दुसरा टप्पा १४ ते २३ ऑगस्ट दरम्यान असून यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रक, आवश्‍यक ती कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन सादर करायची आहेत. याचवेळी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रमही द्यायचा आहे. यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर महाविद्यालयाची गेल्या वर्षीची कट ऑफ लिस्टही मिळेल. त्यानंतर २४ ते २८ ऑगस्ट या कालावधीत निवड यादी तयार होईल.

२९ ऑगस्टला दुपारी तीन वाजता संकेतस्थळावर यादी जाहीर केली जाईल. ३१ ते ५ सप्टेंबर या कालावधीत महाविद्यालयांच्या सुचनेनुसार प्रवेश होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत केवळ ॲनलाईन पद्धतीनेच करायची आहे.  www.dydekop.org या संकेस्थळावर सर्व प्रक्रिया होणार आहे. विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ९५८८६०५७६० या क्रमांकावर संपर्क करावा. 

हेही वाचा- सैनिक दरबारमधील रोटरी- क्रिडाईच्या कोविड सेंटरमंधील १२५ बेडचे लोकार्पण -
एकूण महाविद्यालये - ३४ 
एकूण प्रवेश क्षमता - १४,८१६ 
कला शाखा - मराठी माध्यम ३७२०, इंग्रजी १२० 
वाणिज्य शाखा - मराठी माध्यम ३३६०, इंग्रजी १६५६ 
विज्ञान शाखा - ५९६० 

आवश्‍यक कागदपत्रे
- गुणपत्रक
- शाळा सोडल्याचा दाखला 
- जातीचा दाखला. (आरक्षण लागू असल्यास) 
- उत्पन्नाचा दाखला. (आर्थिक आरक्षित गटातून आरक्षण असल्यास) 
- दिव्यांग, खेळाडू, कलाकार असल्यास त्याचे दाखले, प्रमाणपत्र.  
यातील आवश्‍यक ती कागदपत्रे उपलब्ध नसल्यास त्याबाबतचे हमीपत्र ऑनलाईन द्यावयाचे आहे. 

अशी आहे समिती 
अध्यक्ष - सत्यवान सोनवणे (शिक्षण उपसंचालक) 
सचिव - सुभाष चौगुले (सहाय्यक शिक्षण संचालक) 
कार्याध्यक्ष - डॉ. पी. पी. नागावकर (प्राचार्य, के. एम. सी. कॉलेज) 
सदस्य - प्रा. राजेंद्र कोळेकर 
 

अन्य बोर्डच्या  गुणांचे समायोजन 
सीबीएससी किंवा आयसीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांनी के. एम. सी महाविद्यालयात जाऊन आपल्या गुणांचे समायोजन करून घेण्याचे आहे. त्यांना त्या गुणांचे गुणपत्रक देण्यात येईल. ते त्यांनी प्रवेश प्रक्रियेवेळी वापरायचे आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com