
फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल केला.
जयसिंगपूर (कोल्हापूर) : नोंदणी विवाह करून देण्याच्या कामात जयसिंगपूर येथील वकिलाचीच 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल केला.
वकील राजेंद्र मारुती माने (रा. 18 वी गल्ली, जयसिंगपूर) यांच्या फिर्यादीवरून श्रीकांत सिंग, साहिल कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 27 डिसेंबर रोजी राजेंद्र माने यांच्या मोबाईलवर फोन करून श्रीकांत सिंह व साहिल कुमार यांनी बुधगाव येथील मुलगा आणि मुलगी तुमच्याकडे येतील. त्याचा नोंदणी विवाह (कोर्ट मॅरेज) करुन द्यावयाचा आहे, असे सांगून श्रीकांत सिंग व साहिल कुमार यांनी विवाह करण्याची फी म्हणुन 5 हजार रुपये ऑनलाईन ऍपद्वारे पाठविण्याचे आमिष दाखवले.
त्याकरिता पाच वेळा खात्यावर पैसे जमा करण्याकरिता रिकवेष्ट पाठवली. ती स्विकारल्यानंतर त्यांच्याच खात्यावरुन 29 हजार 86 रूपये कमी होवुन संशयीत आरोपींच्या श्रीकांत सिंह व साहिल कुमार यांच्या खातेवर जमा झाले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच माने यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.
संपादन - अर्चना बनगे