कोरोन्टाईन होऊन भावी लेखक असे घेत आहेत सृजनशिल लेखनाचे ऑनलाईन धडे...  

the online lecture activities for creative writers in kolhapur
the online lecture activities for creative writers in kolhapur
Updated on

कोल्हापूर - झूममधून लेक्चर्स, गूगल क्लासरूममध्ये नोट्स, प्रश्न, असायनमेंट व व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा,‌ या त्रिकोणातून विद्यार्थी सृजनात्मक लेखनाचे धडे गिरवत आहेत. खडू, फळा, समोर बसलेले विद्यार्थी या शिक्षण पद्धतीला कोरोनाने ब्रेक लावला असला तरी त्यांची शिकण्याची ऊर्मी शांत बसू देत नसल्याची परिस्थिती आहे. मूळच्या ‌कोल्हापूरच्या प्रा. डॉ. मनीषा पाटील यांनी राबवलेला आॅनलाईन लेक्चर्सच्या उपक्रमात तेवीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

महाविद्यालयात परीक्षेचा माहोल नुकताच तयार होत असताना कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने देशात संचारबंदी लागू झाली. चालत्या गाडीला अचानक ब्रेक लागल्यावर जसा धक्का बसतो तसे झाले. बस, गाड्या, दुकानं सगळं बंद. रस्त्यावर शुकशुकाट आणि स्मशानशांतता पसरली. सुरुवातीचे दोन दिवस झोपणे, गप्पा, चेष्टा मस्करी यात आनंदात गेले. या परिस्थितीत काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर
सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील ‌इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मनीषा पाटील यांनी शोधले. ऑनलाईन सृजनात्मक लेखनाचा एक छोटासा कोर्स द्यायचा त्यांनी ठरवले. एक आठवडा अभ्यासक्रम तयार करण्यात व त्यासाठी लागणारी तांत्रिक कौशल्य शिकण्यात त्यांनी सत्कारणी लावला.‌ 

महाराष्ट्रातील नांदेड, बीड, पुणे, मुंबई, सातारा आणि कोल्हापूर येथून २३ वेगवेगळ्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. दोन एप्रिलपासून ऑनलाईन लेक्चरला सुरुवात झाली आहे. कानात हेडफोन घालून अतिशय उत्सुकतेने मुलं लेक्चर ऐकतात. एरवी वर्गात कधी प्रश्न विचारले नसतील पण इथं मात्र हिरीरीने प्रश्न विचारतात. लेक्चर्सची चाळीस मिनिटे वेळ निश्चित केली असली तरी दीड तास लेक्चर होते. कोरोनापासून निसर्ग व मैत्री शपासून प्रेमापर्यंत सगळ्या विषयांवर कविता विद्यार्थी लिहितात. 

या कोर्स विषयी ‌डाॅ. पाटील म्हणाल्या, "डायरी लेखन, कथा, कविता, एकांकिका, ब्लॉग असा अभ्यासक्रम असलेल्या या कोर्सला आता मागणी वाढायला लागली आहे. दहावी अकरावीच्या विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सगळ्यांना या आगळ्यावेगळ्या कोर्समध्ये सहभागी व्हायचं आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambabai Temple conservation work allegations
Radhanagari Dam Water Level Reaches 85%
Kolhapur auto rickshaw driver murder latest news
Sadabhau Khot Education
Marathi News Esakal
www.esakal.com