esakal | आंब्याची आवक 25 टक्केच
sakal

बोलून बातमी शोधा

Only 25 percent of mango arrival Kolhapur Marathi News

आंब्याचा हंगाम सुरू होऊन एक महिना होत आला तरी अद्याप बाजारपेठेत आंब्याची आवक जेमतेमच आहे. गेल्या वर्षीपेक्षा 25 टक्केच आंबा अद्याप बाजारपेठेत आला असून भाव स्थिर असल्याने व्यापारीही हवालदिल झाले आहेत.

आंब्याची आवक 25 टक्केच

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : आंब्याचा हंगाम सुरू होऊन एक महिना होत आला तरी अद्याप बाजारपेठेत आंब्याची आवक जेमतेमच आहे. गेल्या वर्षीपेक्षा 25 टक्केच आंबा अद्याप बाजारपेठेत आला असून भाव स्थिर असल्याने व्यापारीही हवालदिल झाले आहेत.

लॉकडाउनमुळे राज्यांच्या सीमा बंद असल्याने कर्नाटक, आंध्र, गुजरात येथून येणारा आंबाही अद्याप कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये आलेला नाही. त्यामुळे यंदा ग्राहकांना पोटभर आंबा खाता येणार का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
यंदा पावसाने कोकणातही हाहाकार माजवला. त्यामुळे थंडी काहीशी उशिराच आली त्यामुळे आंबा येण्यासही वेळ झाला. हे कमी काय म्हणून कोरोनाचे संकट आले आणि निर्यातच बंद झाली. याचा सर्वाधिक फटका कोकणातील आंबा व्यापारी आणि बागायतदारांना बसला. आंबा निर्यात कमी झाली.

यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड या बाजारपेठेत प्रथम श्रेणीचा आंबा लवकर येईल, असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात असे घडले नाही. गेल्या वर्षी एप्रिलच्या मध्यावर जेवढा आंबा कोल्हापूर बाजारपेठेत आला होता. त्याच्या केवळ 25 टक्केच आंबा बाजरपेठेत आला आहे. एक डझन आंबा तीनशे ते सातशे रुपये डझन आहे. 5 डझन आंब्याची पेटी पंधराशे ते दोन हजार रुपये इतकी आहे. 

लॉकडाउनमुळे परप्रांतातील आंबा नाही 
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असून या अंतर्गत राज्यांच्या सिमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे आता कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून येणारा आंबा बाजारपेठेत येऊ शकलेला नाही. 

हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट
यंदा आंबा उशीरा पक्व झाला. लॉकडाउनमुळे आंबा कोल्हापुरच्या बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात आलेला नाही. बहुतांशी व्यापारी मुंबईमध्ये आपला आंबा विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. अद्याप गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्के आंबाही बाजारपेठेत आला नाही. त्यामुळे यंदा आंबा हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट आहे. 
- नंदकुमार वळंजू, आंबा, व्यापारी 

go to top