कोल्हापुरात खासगी रुग्णालयात केवळ चारच बेड ; व्हेंटिलेटरचा एकही बेड नाही शिल्लक

Only four beds available in private hospital at Kolhapur
Only four beds available in private hospital at Kolhapur

कोल्हापूर - शहरातील खासगी रुग्णालयातील ‘बेड’ उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईनला दोन मिनिटांनी एक कॉल येत आहे. हेल्पलाईनच्या सायंकाळी सातला असलेल्या अपडेटमध्ये खासगी रुग्णालयात केवळ चारच बेड शिल्लक होते. त्यात एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याचे सांगण्यात आले. ‘सीपीआर’मध्ये एकूण ३७० बेड असून, त्यापैकी ११३ नॉन ऑक्‍सिजन आणि ऑक्‍सिजनचे ६० बेड सायंकाळपर्यंत शिल्लक होते. मात्र, व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते.

शहरातील एकाही रुग्णाचा विनाउपचार मृत्यू होणार नाही. प्रत्येकाला बेड देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी केली आहे. तेथील तीन मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. या क्रमांकावर संपर्क साधल्यास शहरात कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी कक्षातून २४ तास ही सेवा दिली जात आहे. येथे एकूण नऊ कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारीही आहेत. सायंकाळपर्यंत कक्षातून दिलेल्या माहितीनुसार शहरातील खासगी रुग्णालयात केवळ चार बेड शिल्लक होते. आयसीयूतील व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नव्हता.

शहरातील एकूण २६ खासगी रुग्णालये पालिकेने ताब्यात घेतली आहेत. त्या ठिकाणी रुग्ण दाखल करण्यासाठी तेथील बेडची आवश्‍यकता किती आहे, याची माहिती क्षणाक्षणाला सॉफ्टवेअरद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात मिळत आहे. त्यानुसार सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत दोन मिनिटांना एक कॉल येत आहे. असाच एक कक्ष ‘सीपीआर’मध्ये तयार केला आहे. तेथेही आलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सॉफ्टवेअरचा उपयोग होत आहे.

सायंकाळी सातच्या सुमारास खासगी आणि ‘सीपीआर’मध्ये एकही व्हेंटिलेटरची सोय असलेला बेड नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात शहरातील २७ खासगी रुग्णालयांत व्यवस्था केल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरीही अद्याप सहा-सात रुग्णालयांकडून तांत्रिक बाबी पूर्ण न झाल्याने तेथे प्रतिसाद मिळत नाही.

दृष्टिक्षेपात
 शहरात २० रुग्णालये प्रशासनाकडे नोंद (कागदावर २७)
 खासगी रुग्णालयात एकूण ३५१ बेड
 ऑक्‍सिजनची व्यवस्था असलेले बेड १७२
 नॉनऑक्‍सिजनचे बेड १२६ 
 एकूण ५३ आयसीयू

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com