कोल्हापुरात महाविकास आघाडीसह भाजपचा आज मेळावा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजन

कोल्हापूर:  पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षातर्फे मेळावे आज (ता. २१) घेण्यात येणार आहेत. या निमित्ताने राज्यातील मंत्री, भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचा मेळावा महासैनिक दरबार हॉल येथे दुपारी २ वाजता होणार आहे. तर भाजपचा मेळावा संध्याकाळी ४ वाजता हॉटेल अयोध्यामध्ये होणार आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. उमेदवारांनी जिल्हा दौरे सुरू केले असून नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू आहे. तालुकानिहाय मेळावे घेऊन पतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहेत. महाविकास आघाडीचा मेळावा महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार आहे. मेळाव्याला अर्थमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर)  यांच्यासह आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील उपस्थित 
राहणार आहेत. 

हेही वाचा- ‘माध्यमिक’चे वर्ग ठरल्यानुसारच; अमन मित्तल

भारतीय जनता पक्षाचा मेळावा हॉटेल अयोध्या येथे होणार असून याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल चिक्कोडे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची उपस्थिती असेल.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organized for graduate teacher election campaign kolhapur