दुबईहून तो आला कोल्हापूरात अन् नाके बंदी करुन त्याला घेतले ताब्यात...

A passenger from Dubai stopped the ST bus and brought it to CPR Hospital for corona test
A passenger from Dubai stopped the ST bus and brought it to CPR Hospital for corona test

कोल्हापूर - दुबईमधून आलेल्या पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील एका प्रवाशाला इस्पूर्ली येथे एसटी बस थांबवून तपासणीसाठी सीपीआर रूग्णालयात आणले. दरम्यान, या प्रवाशाला थांबवण्यासाठी चक्क नाकाबंदी करावी लागली. मात्र या प्रवासाची मुंबई येथे सर्व तपासणी केली असल्याचे सांगितल्यानंतर बसमधील प्रवाशांसह तपासणी करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. 

मुंबईत झाली होती तपासणी 

पुण्यामध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातही दक्षता घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनकाडून खबरदारीच्या उपाय-योजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे. आज कोल्हापूर- गारगोटी मार्गावरील नाकाबंदी करून संशयित प्रवाशाला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान बसमध्ये दुबईहून आलेल्या प्रवाशी असल्याचे लक्षात येताच सर्वच प्रवासी घाबारले. पण त्याची सर्व चौकशी मुंबई येथे झाली होती. तसेच, आरोग्य अधिकाऱ्यांनीही घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगितल्यानंतर प्रवाशांनीही सुटेकेचा निश्‍वास सोडला. 

पुष्पनगर येथे जाण्यासाठी ज्या बसमध्ये प्रवासी बसला होता. त्याची माहिती मिळतचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करून त्याला इस्पूर्ली येथे ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची तपासणी करण्यासाठी कोल्हापूरमध्ये आणले आहे. तोंडाला मास्क, हाताला ग्लोज, सर्व साहित्य झाकलेले अशा अवस्थेतील प्रवाशाला बघून बसमधील अन्य प्रवासी घाबरले. दरम्यान, त्यातीलएच काही प्रवाशांनी या प्रवाशाची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवली नियंत्रण कक्षाने संबंधित मार्गावरील आरोग्य केंद्र आणि पोलीस ठाण्यांना तातडीने सूचना दिली. इस्पुरली (ता.करवीर) येथील येथे नाकाबंदी करून पोलिसांनीही बस थांबवली सर्व प्रवाशांना खाली उतरून नंतर संशयित प्रवाशाला रुग्णवाहिकेतून आरोग्य केंद्रात आणले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com