सांगलीतील लोक विनापरवाना कोल्हापुरात 'या' ठिकाणी येवून राहत आहेत...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

कोल्हापूरमध्ये परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत 26 हजार लोक कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेताच आले आहेत. यातच आता सांगलीतील रेडझोन मधून मोरेवाडी परिसरात रहायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातील रेडझोन परिसरातील अनेक लोक मोरेवाडी, पाचगाव (ता. करवीर) परिसरात येवून राहत आहे. या परिसरात असणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेच्या परिसरातच हे लोक राहत आहेत. जे लोक येत आहेत, त्यांच्याकडे कोणताही परवानगी नाही. ई-पास नाही, असे असतानाही ते कोठेही क्वारंटाईन होत नाहीत. ज्या ठिकाणी हे राहत आहेत. त्या ठिकाणच्या लोकांना कुठे तक्रार करावी, हेही समजत नाही. रात्री किंवा पहाटेच्यावेळी हे लोक येत असून याकडे संबंधीत यंत्रणेणे लक्ष देवून अशा लोकांना मज्जाव केला पाहिजे किंवा त्यांना चौदा दिवस क्वारंटाईन केले पाहिजे.

वाचा - धक्के सुरूच ; कोल्हापुरात कोरोना रूग्णांची संख्या पाचशेजवळ ; आणखी १७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह

कोल्हापूरमध्ये परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत 26 हजार लोक कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेताच आले आहेत. यातच आता सांगलीतील रेडझोन मधून मोरेवाडी परिसरात रहायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शाळेतील कर्मचारी म्हणून असणारे हे लोक कोणत्याही सूचनांची आणि बंदीच्या आदेशाला न जुमानता येत आहे. काही जण भाड्याच्या घरात रहायला आहेत. ज्यांनी घर भाड्याने दिले आहेत. त्यांच्याकडूनही कोणतीही तक्रार होत नाही. मात्र त्यांच्या शेजारी राहिलेल्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक लोकांकडून जिल्हा प्रशासनाच्या नंबरवर तक्रार केली जात आहे. याकडे लक्ष दिले जात नाही. या बाहेरुन येत असलेल्या लोकांना किमान होम क्वारंटाईन करुन ठेवले पाहिजे. मात्र हे लोक कामाच्या ठिकाणी खुले आम फिरत आहेत. अशांमुळे रहिवासी परिसरात धोका निर्माण होवू शकतो.
 

मोरेवाडी परिसरात असणाऱ्या कॉलनींमध्ये सांगली जिल्ह्यातून अनेक लोक येत आहे. यांना क्वारंटाईन केलेले नाही. त्यांच्या हातावर शिक्काही नाही. दोन ते तीन महिन्या आपआपल्या गावाकडे राहिलेले आता परत आले आहेत. त्यांची कोणतीही चौकशी झाली आहे की नाही, हे प्रशासनाने पाहायला पाहिजे. - संदेश जगताप, मोरेवाडी परिसर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People from Sangli are living in Kolhapur without permission