महावितरणच्या कर्मचाऱ्यांची जिद्द ः पुरात पोहत जाऊन केली फिडरची दुरुस्ती

Persistence of MSEDCL employees: Repair of Kelly feeder after swimming in flood
Persistence of MSEDCL employees: Repair of Kelly feeder after swimming in flood
Updated on

कागल, कोल्हापूर : एकीकडे गणेश आगमनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरुळीत करण्यासाठी धडपडत होते. बंद पडलेला गावठाण फिडर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरू करण्यात आला. शेंडूर (ता. कागल) येथे शनिवारी सकाळी नदीच्या पूरातून पोहत जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी फत्ते केली. 
श्री गणेशाच्या आगमनादिवशी घराघरात आनंदी व उत्साहाचे वातावरण असते. रंगीबेरंगी प्रकाश देणारे वीजेचे ब्लब या सजावटीसाठी वापरले जातात. या सजावटीसाठी महत्वाची भूमिका असते ती म्हणजे वीजेची. तिचा वापर अनिवार्य असतो. पण वीज नसेल तर या आनंदावर विरजण पडते. ते होऊ नये, वीजपुरवठा अखंडीत रहावा यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. 
सद्या दूधगंगा नदीला पूर आला आहे. शनिवारी गणेश आगमनादिवशी महावितरणचा शेंडूर ( ता. कागल) येथील 11 केव्हीचा गावठाण फिडर शनिवारी पहाटे बंद पडला. या फिडरला विद्युत पुरवठा करणारी 11 केव्हीची उच्चदाबाची वाहिनी तुटून दूधगंगा नदीच्या पूर आलेल्या पात्रात पडली आणि या फिडरवर अवलंबून असलेल्या सिध्दनेर्ली, बामणी, शेंडूर, व्हनाळी आणि साके या पाच गावातील वीजपुरवठा खंडीत झाला. लोकांच्या आनंदोत्सवात अडथळा होऊ नये, गावे अंधारात राहू नयेत यासाठी महावितरण कंपनीच्या सिद्धनेर्ली आणि म्हाकवे शाखेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला लागले. पुराच्या पाण्याला वेग असतानाही वायरमन उदय भिसुरे आणि राम सुतार हे दोघे पुराच्या पाण्यात पोहत गेले. त्यांनी तुटलेली उच्चदाबाची विद्युत वाहिनी नदीपात्रातून बाहेर काढली व फिडर पूर्ववत सुरू करून सिध्दनेर्ली, बामणी, शेंडूर, व्हनाळी आणि साके गावातील विद्युत पुरवठा सुरू केला. या कर्मचाऱ्यांना उपकार्यकारी अभियंता गणेश पोवार आणि सहाय्यक अभियंता श्रेयश कुसाळे यांनी मार्गदर्शन केले. बंद पडलेला गावठाण फिडर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरू करण्यात आला. या मोहिमेत नितीन पाटील, अमर पाटील, अजिंक्‍य शिंत्रे, शिशिर देसाई, कलंदर मुल्ला, मारुती सुळगावे, संग्राम वाडकर, तमन्ना पुजारी, धीरज मोरे आदींनी सहभाग घेतला. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com