esakal | उच्च न्यायालयाचा निर्णय :"गोकुळ' च्या सत्ताधाऱ्यांची याचिका फेटाळली 

बोलून बातमी शोधा

petition filed in the High Court by two primary milk institutes was rejected gokul political marathi news

उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने "गोकुळ' ची निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवली आहे.

उच्च न्यायालयाचा निर्णय :"गोकुळ' च्या सत्ताधाऱ्यांची याचिका फेटाळली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर:  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक पुढे ढकलण्याबाबत सत्तारूढ गटाच्यावतीने दोन प्राथमिक दूध संस्थांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज फेटाळण्यात आली. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात 12 मार्च रोजी दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. ही सुनावणी कधी होईल याची खात्री नसल्याने ही याचिकाही मागे घेतल्याचे समजते. त्यानंतर उच्च न्यायालयात या दोन संस्थांनी याचिका दाखल केली होती, पण तीही फेटाळल्याने संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हेही वाचा- चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत महत्वाचा निर्णय : सोमवारी दुकाने सुरू करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार

उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने "गोकुळ' ची निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान आहे. 20 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून त्याच दिवशी या निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाची स्थिती काय राहील यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. 

अध्यक्षांच्या पत्नींची माघार 
या निवडणुकीतून आज संघाचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्या पत्नी सौ. पद्‌मजा रविंद्र आपटे यांनी आपला सर्वसाधारण गटातील अर्ज मागे घेतला. महिला प्रतिनिधी गटातून त्यांची उमेदवारी कायम आहे. आजअखेर चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. 

संपादन- अर्चना बनगे