पेट्रोल पंप चालकांची अशीही मनमानी 

petrol Pump Employees refuse to give petrol to bank employees
petrol Pump Employees refuse to give petrol to bank employees

कोल्हापूर - संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्‍यक सेवेत असलेल्या वाहनांनाच पेट्रोल-डिझेलची विक्री केली जात आहे. तरीही बॅंक कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्यास पंपावरील कर्मचाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. ओळखपत्र दाखविल्यानंतर केवळ नॅशनल बॅंकातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देतो, असे सांगितले जाते. 

अत्यावश्‍यक सेवेची यादी शासनाकडून जाहीर केली आहे. त्यात बॅंकेचे अधिकारी-कर्मचारी यांचाही समावेश आहे. अशा कर्मचाऱ्यांना बॅंकेत ये-जा करण्यासाठी पेट्रोल देणे आवश्‍यक आहे. तरीही फुलेवाडी येथील एका पंपावर बॅंक कर्मचाऱ्यांने पेट्रोल देण्यास नकार दिला. 

यावेळी त्यांनी मी काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथून आलो आहे. स्वतःचे ओळखपत्र दाखवले, ओळख सांगितली. तरीही त्यांना कर्मचाऱ्यांनी येथे थांबायचे नाही, असे सुनावले. यावेळी बॅंक कर्मचाऱ्यांनी आम्ही अत्यावश्‍यक सेवेत आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी बेँकेत आहे. असे ही सांगितले. मात्र त्या कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन करीत केवळ अत्यावश्‍यक सेवेतील नॅशनल बॅंकांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांनाच पेट्रोल देण्याचे आदेश आहेत. "आम्ही तुम्हाला पेट्रोल देणार नाही, असे सांगून त्या कर्मचाऱ्याला हाकलून दिले. 
संबंधित कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, की बॅंकेतील कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी स्वतःची दुचाकी वापरावी लागते. बॅंक सुरू असते. तर को-ऑपरेटिव्ह बॅंकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, असे का सांगितले जाते. पेट्रोल मिळाले नाही तर बॅंकेपर्यंत यायचे कसे ? केवळ नॅशनल बॅकांनाच पेट्रोल देण्याचा कोणता आदेश असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना तो जाहीर करावा, व को-ऑपरेटिव्ह बॅंका बंद कराव्यात. अन्यथा आम्हाला पेट्रोल देण्याच्या सूचना पंप चालकांना कराव्यात. 

पेट्रोल पंपावर सर्व अत्यावश्‍यक सेवेच्या वाहनांना पेट्रोल दिले पाहिजे. केवळ नॅशनल बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल देणे चुकीचे आहे. सर्वच बॅंक कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना पेट्रोल देणे आवश्‍यक आहे. ज्यांनी सहकारी बॅंक कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर जिल्हा पुरवठा विभागाकडून योग्य ती कारवाई करू. 
- वैभव नावडकर, करवीर, प्रांताधिकारी. 

कोणतीही बॅंक, पतसंस्था असली तरीही कर्मचारी-अधिकाऱ्यांना पंपावर पेट्रोल दिले जाईल. संबंधित पेट्रोल पंप चालकांना याबाबत योग्य त्या सुचना दिल्या आहेत. संबंधितांनीही एकाच वेळी जादा रक्कमेचे पेट्रोल घ्यावे. ज्यामुळे वारंवार पेट्रोल पंपावर यावे लागू नये. 
- गजकुमार मानगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com