ती म्हणाली, खून करून ये माझ्याजवळ; मोबाईलवरच्या  मेसेजने पोलिसांना बसला धक्काच   

Photographer Vijay Avalakki killed case in khanapur
Photographer Vijay Avalakki killed case in khanapur
Updated on

खानापूर (बेळगाव) : खून कर आणि माझ्या मिठीत ये, असा संदेश मोबाईलवर दिसला आणि पोलिसांना धक्काच बसला. पण, यावरूनच जांबोटी येथील छायाचित्रकार विजय आवलक्की (वय 52) यांच्या खूनामागे त्यांच्या पत्नीचा हात असल्याचे स्पष्ट झाले. तिचा हा संदेश मोबाईलवर वाचून रामचंद्र कांबळे याने विजय यांच्यावर चाकूने सपासप वार केले. विजय यांची पत्नी सुबोधा हिला अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

 
जांबोटी येथील छायाचित्रकाराच्या खून प्रकरणाने जांबोटी भागात खळबळ उडवून दिली आहे. सुरूवातीला हा खून प्रमुख संशयीत आरोपी रामचंद्र बाबूराव कांबळे याला विजय यांनी कामावरून काढून टाकल्याच्या आणि पगार न दिल्याच्या रागातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण, विजय यांची पत्नी सुबोधा हिला अटक करून त्यांचा मोबाईल हस्तगत केल्यानंतर भयानक प्रकार समोर आला आहे. खून होण्यापूर्वी आणि खून झाल्यानंतरही सुबोधा हिने रामचंद्रशी मोबाईलवरून संदेशाद्वारे संवाद साधल्याचे स्पष्ट झाले आहे. 

खून करून थेट माझ्या मिठीत ये, असा संदेश तिने रामचंद्र याच्या मोबाईलवर पाठविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. रामचंद्र आणि नारायण यांनी त्यांच्या अल्पवयीन मित्रांसमवेत निर्दयीपणे खून केल्यानंतरही अगदी कांहीच घडले नाही या अविर्भात एकमेकांना मोबाईलवरून संदेश पाठवून खूनाची माहिती दिली. खून करून आल्यानंतर त्या पाचही संशयीतांनी एका ढाब्यावर जेवन केले. जांबोटीत पोहचल्यानंतर रामचंद्र हा सुबोधाला ठरल्याप्रमाणे भेटायला गेला. खूनाचा अशा पध्दतीने कट रचण्यात सराईत गुन्हेगारही पटाईत नसतात, तेवढ्या सहजतेने रामचंद्र आणि सुबोधा यांनी विजय यांचे शीर धडावेगळे केल्याने या भागात संताप आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Sugar Season 2026
UPI Transaction Charges on Payments
Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Amal Mahadik Reveals BJP Strategy After Chandrakant Patil's Crucial Meeting
Marathi News Esakal
www.esakal.com