आजरा तालुक्यात यंदा देशी वाणांबरोबरच संशोधित, सुधारित जातींना पसंती

Planting Completed On 8700 Hectares in Ajara Taluka Kolhapur Marathi News
Planting Completed On 8700 Hectares in Ajara Taluka Kolhapur Marathi News

आजरा : आजरा तालुक्‍यात रोपलावणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून सुमारे 8 हजार 700 हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. तालुक्‍यातील भाताच्या एकूण क्षेत्रापैकी 90 टक्के क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. यंदा देशी वाणांबरोबरच संशोधित, सुधारित प्रजातीची बियाणे शेतकऱ्यांनी निवडली आहेत. पावसाने हात दिल्यास आठवडाभरात रोपलावणीचे काम उरकले जाईल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. 

तालुक्‍यात भाताचे सरासरी 9 हजार 700 हेक्‍टर क्षेत्र आहे. यापैकी सुमारे 4 हजार हेक्‍टर क्षेत्रावर भाताची रोप लावण केली जाते. अतिपावसाच्या म्हणजे तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात रोपलावणीचे क्षेत्र आहे. पूर्व भागात टोकणी, कुरी पद्धतीने भात पिकांची लागवड केली जाते. पावसाने चांगली साथ दिल्याने पूर्व भागात भाताची उगवण चांगली झाली आहे.

भात मशागतीची म्हणजे कोळपण, भांगलणची कामे सुरू आहेत, पण पश्‍चिम भागात रोपलावणीचे काम आजही सुरू आहे. तालुक्‍यात 8 हजार 700 हेक्‍टरवर भाताची लागण झाली आहे. एक हजार हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागण व्हायची आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने रोपलावणीचे काम खोळंबले आहे. मुख्यतः माळरानावरील रोपलावणीचे काम ठप्प आहे. नदी व ओढ्याकाठी व जिथे पाण्याची सोय आहे तेथे रोपलावणीचे काम सुरू आहे. सध्या पावसाची नितांत गरज असून जोरदार पाऊस झाल्यास आठवडाभरात रोपलावणीचे काम संपेल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. 

तालुक्‍यात इंद्रायणी, जया, भोगावती, शुभांगी, सारथी, सोनम, एचएमटी सोना, सोना मसुरी, रत्नाया भातांच्या जातीबरोबर संशोधीत फुले समृध्दी, आर वन, कोहीमतूर 51, आर एच वन या प्रजातीची लागवड झाली आहे. खासगी कंपन्याकडील बियाण्यांनाही शेतकऱ्यांनी पसंदी दिली आहे. त्याचबरोबर काळा जीरगा, चंपाकळी, घनसाळ या बियाण्यांची लागवडही झाली आहे. 

आठवडाभरात रोपलावणीचे काम पूर्ण
तालुक्‍यात यंदा पाऊस घातीवर झाल्याने भाताची पीक चांगली आहेत. पश्‍चिम भागात भात लावणीचे काम अंतीम टप्प्यात आहे. पाऊस जोरदार झाल्यास आठवडाभरात रोपलावणीचे काम पूर्ण होईल. 
- विजयसिंह दळवी, कृषी पर्यवेक्षक, आजरा 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com