पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

लुमाकांत नलवडे
Monday, 25 January 2021

दरम्यान यापूर्वी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपदी काम केलेल्या आणि सध्या सीडीबी बेलापूर येथे कार्यरत असलेल्या दिनकर मोहिते यांनाही हे पदक जाहीर झाले.

कोल्हापूर  : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत यांना आज त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. राज्यातील एकूण 40 जणांना हे पदक जाहीर झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील  सावंत हे एकमेव आहेत. 

दरम्यान यापूर्वी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपदी काम केलेल्या आणि सध्या सीडीबी बेलापूर येथे कार्यरत असलेल्या दिनकर मोहिते यांनाही हे पदक जाहीर झाले. प्रजासत्ताक दिना दिवशी हे पदक मिळणार आहे. 

हेही वाचा- Video : तिसरी पर्यन्त शिक्षण घेणारी कांचनताई बनल्या 'गुळव्या' पाहा व्हिडीओ

सावंत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांमध्ये  निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढणे, चोऱ्या उघडकीस आणणे याच बरोबर परराज्यातील टोळ्यांचा बंदोबस्त करून एनकाउंटर करण्याबरोबरच सावंत यांनी तपासात अनेक कर्तव्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाने आज पोलिस पदक जाहीर जाहीर केले आहे. हे पदक मिळविणे ही पोलीस दलातील एक शान मानली  जाते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Inspector Tanaji Sawant awarded President's Police Medal kolhapur marathi