sakal

बोलून बातमी शोधा

policeman slapping the youngster in the shirol kolhapur marathi news

शिरोळ येथे नाकाबंदी दरम्यान मोटारसायकलस्वाराने न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अडविले असता,

 

पोलिसाला थप्पड मारने त्याला पडले महागात....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरोळ (कोल्हापूर) : शिरोळ येथे नाकाबंदी दरम्यान मोटारसायकलस्वाराने न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अडविले असता, शिवीगाळ करून पोलिसाला थप्पड लगावल्याने खळबळ माजली आहे. शिरोळ पोलिसांनी संबंधित मोटारसायकलस्वाराला अटक करून, न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. प्रणव उदय खराडे (वय २६, रा शिरोळ) असे पोलिस कोठडी मिळालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला यासाठी लिम्का बुकचे प्रमाणपत्र
शिरोळ पोलिस १० मार्चला रात्री अकराला नाकाबंदी करून वहानाची तपासणी करीत होते. यावेळी प्रणव उदय खराडे हा मोटारसायकली वरुन येत होता. पोलिसांनी खराडे याला मोटारसायकल थांबवण्यास सांगितले असता, त्याने मोटार सायकल न थांबवता पळुन गेला याप्रंसगी पोलिस नाईक संतोष जाधव यांनी पाठलाग करुन पकडले. यावेळी खराडे यांने जाधव यांना शिवीगाळ करीत,गळपट धरुन चक्‍क थप्पड लगावली. जाधव यांनी प्रणव खराडे याचे विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. रात्री खराडे यास शिरोळ पोलिसांनी अटक 
केली आहे. 

हेही वाचा- कुसुमाग्रज महाराष्ट्राचे कविनायक

नाकाबंदीवेळी पळून जाताना पकडले​
दरम्यान, खराडे  याला जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील सुर्यकांत मरजे यांनी घडलेला गुन्हा गंभीर असल्याची बाब न्यायालयास सांगितले तसेच खराडे यांनी पळुन जाण्यामागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या अधारे सात दिवसाची पोलिस कोठडी मागितली तथापी न्यायालयाने खराडे याला दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली.

go to top