धोकादायक : पन्हाळा तालुक्‍यात वाढताहेत पॉझिटिव्ह रूग्ण

राजेंद्र दळवी 
मंगळवार, 14 जुलै 2020

पन्हाळा तालुक्‍यातील पोर्ले तर्फ ठाणे व करंजफेण येथील बाधितांच्या संपर्कात आलेले पॉझिटिव्ह आल्याने तालुक्‍यात कोरोना समूह संसर्गाचा धोका वाढला आहे.

आपटी : पन्हाळा तालुक्‍यातील पोर्ले तर्फ ठाणे व करंजफेण येथील बाधितांच्या संपर्कात आलेले पॉझिटिव्ह आल्याने तालुक्‍यात कोरोना समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. पोर्ले तर्फ ठाणे येथील 47 वर्षीय प्रिंटिंग व्यावसाईक बाधित झाला होता. आज त्या युवकावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरसह नात्यातील पाच जण बाधित झाले. मंगळवारी बाधित झालेल्या 
करंजफेण वृद्धाच्या संपर्कातील आणखी दोघे बाधित झाले. याच बरोबर पोखलेतील वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

पोर्ले तर्फ ठाणे येथील प्रिंटिंग व्यावसाईक आठ दिवस आजारी होता. त्याने गावातील डॉक्‍टरकडे उपचार घेतले होते. त्याच वेळी त्यांने रक्ताचीही तपासनी करून घेतली होती. नंतर कोल्हापूर येथे उपचारार्थ दाखल केले होते. तेथे स्वॅब घेतल्यानंतर तो बाधित असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे प्रथम संपर्कात आलेल्यांची तपासणी केली. त्यामध्ये नात्यातील व्यक्तींबरोबर युवकावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरसह औषधदुकानदराचा व रक्ताची तपासणी केलेल्या लॅबमधील व्यक्तींचा समावेश होता.

या पैकी काही जणांचा अहवाल आज प्रशासनास प्राप्त झाला. त्यामध्ये त्याची पत्नी, मुलगा, दोन चुलत भाऊ व डॉक्‍टर अशा पाच जण पॉझिटिव्ह आले. करंजफेण येथील वृद्धाच्या द्वितीय संपर्कातील महिलेसह बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. पोखलेतील वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

ट्रॅव्हल हिस्ट्री नाही तरीही... 
करंजफेण येथील एकाच कुटुंबातील आठ जण शुक्रवारी बाधित झाले होते तर आज पोर्लेतील बाधित युवकाच्या संपर्कातील पाच जण बाधित झाले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्यामुळे तालुक्‍यात कोरोना समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive patients are increasing in Panhala taluka