युवकांना राज्यघटनेचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे : प्रा.डॉ.प्रकाश पवार

मतीन शेख
Wednesday, 27 January 2021

'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्तत व्याख्यान संपन्न...

कोल्हापूर - भारतीय राज्यघटेने दिलेल्या स्वातंत्र्याची मुळ जाणीव नागरिकांना नाही.आपले संविधान प्रत्येक माणसावर विश्वास ठेवते आणि त्याचे अस्तित्व मान्य करते.राज्यघटना माणसाच्या इच्छेचा विचार करते.संविधान व्यक्तीला विवेकाने वागायला शिकवते.हेच संविधान समजुन घ्यायला आपण कमी पडत आहोत.यामुळे न्यायी समाजाची बांधणी होत नाही.माणसाला आकार देण्याचं काम घटना करते परंतू राज्यघटना फक्त अभ्याक्रमापुरती मर्यादित राहिली आहे.ती प्रत्येक नागरिकांपुढे खुली होणे गरजेची आहे.असे प्रतिपादन जेष्ठ राजकिय विश्लेषक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले.युवकांनी संविधानातून काय शिकले पाहिजे, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज,बिंदू चौक येथे आयोजीत व्याख्यानात ते बोलत होते.
 
डॉ.पवार पुढे म्हणाले, स्वतःचे प्रतिनिधीत्व निर्माण करण्याची संधी संविधानाने आपल्याला दिली आहे.मानवतावादाचे तत्व राज्यघटनेने आपल्याला दिले आहे.युवकांना राज्यघटनेचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे.त्यासाठी त्यांनी संविधान वाचणे गरजेचे आहे.संविधानातून पुढे येणाऱ्या स्वातंत्र विचारांची जनजागृती सकाळच्या माध्यमातून 'यीन' सारख्या व्यासपीठावरुन होत आहे ही कौतुकाची बाब असल्याचे ही ते म्हणाले.
 
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही.ए.पाटील होते.तर डॉ.एस.एफ.बोथीकर,डॉ.सौ.एस.एस.कदम,डॉ.आर.एस.नाईक हे उपस्थित होते.तसेच या व्याख्याना बद्दल विद्यार्थी संग्राम शिंत्रे,श्रद्धा फेफडे,साक्षी भांडवले,पराग हिर्डेकर,सुस्मिता धवन यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे आयोजन 'यिन'चे समन्वयक अवधूत गायकवाड यांनी केले.
 
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash pawar lecture on constitution in commerce college kolhapur