Gudi Padwa Festival : कोरोनाचे संकट टळू दे गुढीला केली प्रार्थना...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

शहरातही गुढी पाडव्याचां उत्साह फारसा दिसून आला नाही. अपार्टमेंट मध्ये ही फ्लॅटच्या बाल्कनीत अनेकांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले.

कोल्हापूर :  संपूर्ण जग ,देश , राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे . या सर्व पार्श्वभूमीवर आज गुढीपाडवा सण साजरा झाला. वर्षानुवर्षे हा सण साजरा करणाऱ्या कुटुंबांनी आज मात्र या उत्सवाला फाटा दिला. तर ज्यांनी हा सण साजरा केला त्यांनी कोराना चे संकट टाळण्यासाठी प्रार्थना केली.

संपूर्ण जगापासून ते अगदी गावापर्यंत कोरोनाने थैमान घातले आहे . गावांच्या, शहराच्या ,देशाच्या सिमा बंद करण्यात आले आहेत. लवकरात लवकर देशातून कोरोना हद्दपार व्हावा, यासाठी शासकीय स्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे .

हेही वाचा- गड्या आपला गाव बरा म्हणत 40000 लोक दाखल ; 13 हजार कर्मचारी लढ्यासाठी सज्ज

देशातून कोरोना हद्दपार व्हावा केली प्रार्थना

कोरोनाच्य पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यातच हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असणाऱ्या गुढीपाडव्यावर देखील कोरोनाचे सावट पसरले आहे . शहरातील बहुतांश चिवा बाजार ओस पडला असल्याचे पाहायला मिळाले. शहर आणि गावा गावात मोठ्या उत्साहाने होणारा गुढीपाडवा यावेळी मात्र अत्यंत मर्यादित पार पडला. 

 हेही वाचा- गर्दी टाळण्यासाठी देवरुखने लढवली अशी युक्ती...

उत्साह कमीच

शहरातही गुढी पाडव्याचां उत्साह फारसा दिसून आला नाही. अपार्टमेंट मध्ये ही फ्लॅटच्या बाल्कनीत अनेकांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. यावेळी देशातून कोरोना हद्दपार व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली.

दरवर्षी आम्ही मोठ्या थाटात गुढीपाडवा साजरा करतो. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट आहे. देशावर आलेले हे भयंकर संकट लवकरात लवकर परत जावे, अशी प्रार्थना यावेळी गुढीला करण्यात आले. - गिरिधर श्रीधर रेवणकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pray to Guddi to prevent Corona crisis kolhapur marathi news