
बंगळूर : सरकारने लस येण्यापूर्वीच कर्नाटकातील लसीकरण केंद्रांची ओळख सुरू केली आहे. कोविड- १९ प्रकरणांच्या वाढत्या संख्येबरोबर आरोग्य विभागाला सामान्य लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांचे नकाशे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या परिसरातील काही विशिष्ट गावे लसीकरण केंद्रात रुपांतरित केली जातील. फिरते विभागही (मोबाईल युनिटही) राज्यातील कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी वापरले जातील.
मंजुरी मिळाल्यानंतर लस देताना वेळ गमावू नये, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या सूत्रांनी ही व्यवस्था करण्याचे ठरविले आहे.
हेही वाचा- वाफाळलेल्या चहाची लज्जत भारी ; कोल्हापुरच्या ऑटोमशिनची किमयाच न्यारी -
लस येण्यापूर्वी आम्ही सर्व काही तयार ठेवू,अशी माहिती सूत्रांनी दिली. कोविड व्यवस्थापनाचे प्रभारी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच ४००-५०० दशलक्ष डोस प्राप्त करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्याची योजना तयार केली आहे. कोविड - १९ लस तयार झाल्यावर जुलै २०२१ पर्यंत सुमारे २५ कोटी लोकांना डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मंत्री म्हणाले, कोविड -१९ लसीच्या खरेदीपासून ते साठवणुकीपर्यंत, वैयक्तिक लाभार्थ्यांच्या वितरणापर्यंतचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. लस देणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ऑनलाइन मॉड्यूलही विकसित करण्यात आले आहेत.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.