कोल्हापूरच्या माजी खासदारांना कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

त्यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील चार दिवसांपासून आजारी होते.

जयसिंगपूर (कोल्हापूर) :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले. येथील खासगी रुग्णालयात केलेल्या एचआरसीटीमध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. शिरोळ येथील त्यांच्या निवासस्थानी ते होमक्वारंटाईन झाले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात ते शिक्षक दिनी आंदोलन करणार होते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. त्यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील चार दिवसांपासून आजारी होते.

हेही वाचा- Video - बाप हा बापच असतो...! मुलाच्या मृत्यूनंतर 91 व्या वर्षी पुन्हा उभा ठाकला लढायला

स्वॅब तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शेट्टी यांनादेखील दोन दिवसांपासून ताप होता. येथील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी स्वॅब तपासणी करून घ्यावी. अहवाल येईपर्यंत कार्यकर्त्यांनी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Swabhimani Shetkari Sanghatana and Former MP Raju Shetty Corona Positive