केंद्र सरकार असंवेदनशील : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

आज सकाळी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कोल्हापूर : जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्यात गैर काय आहे? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. आज सकाळी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याची मानसिकता केंद्र सरकारची नाही. फक्त दिखावा म्हणून बैठका घेतल्या जातात. त्यावर निर्णय काही होत नाही. सिरम इन्स्टिट्यूटला अजितदादांनी भेट दिली आहे. आज तिकडे मुख्यमंत्री जाणार आहेत. प्रशासन तिथे पूर्ण ताकदीने काम करत आहे. महाराष्ट्रावर सातत्याने केंद्र सरकार अन्याय करते आहे. केंद्र सरकार मध्ये आपले प्रचंड पैसे अडकलेले आहेत. त्यामुळे राज्याला निधी मिळत नाही. 

यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल विचारले असता, धनंजय मुंडे यांचे प्रकरण वैयक्तिक बाब आहे. ती आता पोलिसांची जबाबदारी आहे. याबद्दल पोलिसच काय तो योग्य निर्णय घेतील असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

हेही वाचा - पक्ष एक व्हीप मात्र दोन, हुपरी पालिकेत विचित्र स्थिती -

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: press conference in kolhapur supriya sule and sharad pawar is on kolhapur tour in kolahpur