esakal | हापूसने सोडले तोंडाला पाणी; एका आंब्याची तब्बल एवढी किंमत 
sakal

बोलून बातमी शोधा

Price increase of Mango mango

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज हापूस आंब्याची आवक झाली. यात एका आंब्याचा ३१२ ते ५२० रुपये दर जाहीर करण्यात आला. चार डझन आंब्यांसाठी १५ हजार ते २५ हजार रुपये इतका दर जाहीर केला.

हापूसने सोडले तोंडाला पाणी; एका आंब्याची तब्बल एवढी किंमत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज हापूस आंब्याची आवक झाली. यात एका आंब्याचा ३१२ ते ५२० रुपये दर जाहीर करण्यात आला. चार डझन आंब्यांसाठी १५ हजार ते २५ हजार रुपये इतका दर जाहीर केला. अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे यावर्षी हापूस आंब्याला फटका बसणार, असे चित्र होते. वातावरणात होणारा वारंवार बदलही आंब्याच्या मोहरावर परिणामकारक ठरला आहे. 

हे पण वाचा -  अबब... ७४ वर्षाचा कॉलेज कुमार पाहिलात का?

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हापूस आंब्याच्या आवकेवर परिणाम दिसून येणार आहे. अतिवृष्टीमुळे आंब्याचे पिक धोक्‍यात आल्याचा फटकाही बसणार आहे. त्यामुळे या हंगामात हापूसचे दर चढेच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. वीस ते पंचवीस दिवसांत आवकेत वाढ होण्याची शक्‍यताही वर्तवली आहे.

हे पण वाचा - नाणार प्रकल्प होणार नाहीच- मुख्यमंत्र्यांचा त्या जाहिरातीवर खुलासा

यंदाच्या हंगामातील पहिल्या चार डझन पेटी आंब्याची आवक बाजार समितीत झाली आहे. सभापती दशरथ माने यांच्या हस्ते व उपसभापती शारदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सौदे काढले. फळे-भाजीपाला मार्केटमधील दस्तगीर बागवान यांच्या अडत दुकानात देवगड तालुक्‍यातील विकास फणसेकर, अक्षय देवळेकर, सचिन गोवेकर यांच्या हापूस आंब्याची आवक झाली. यावेळी कृष्णात पाटील, सर्जेराव पाटील, शेखर येडगे, नंदकुमार वळंजू, बाबूराव खोत सरदार पाटील सचिव मोहन सालपे, उपसचिव तानाजी मोरे जयवंत पाटील आदि  उपस्थित होते.