Kolhapur CPR Fire : रुग्ण ट्रान्स्पोर्ट ट्रॉलीची प्रतीक्षाच, रुग्णांची ने-आण होते साध्या स्ट्रेचरवरून

problems regarding CPR hospital kolhapur about patients transfer to one department to other in hospital area
problems regarding CPR hospital kolhapur about patients transfer to one department to other in hospital area

कोल्हापूर : सीपीआर ट्रामा केअरमध्ये सोमवारी लागलेल्या आगीनंतर  सीपीआरमधील सोयी-सुविधांचा पंचनामा सुरू झाला. कोविड रुग्णालय झालेल्या या हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे अत्यवस्थ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या ट्रॉमा केअर विभागाला आग लागली आणि सुमारे २० बेडच्या या अतिदक्षता विभागातील रुग्ण सुखरूपपणे हालवण्याचे दिव्य डॉक्‍टर आणि सिस्टर, वॉर्डबॉयनी मोठ्या धाडसाने केले. आगीवेळी पीपीई किटसह प्रवेश करणे म्हणजे धाडसाचे होते.

रात्र असल्याने कोणी बाहेरून मदत बोलावणेही  शक्‍य नव्हते आणि कोणी आले तरी पॉझिटिव्ह रुग्णांना बाहेर नेण्याचे धाडस सामान्य माणूस करणे शक्‍य नव्हते. यातील बहुतांशीजणांना ऑक्‍सिजन लावला होता. अशा अवस्थेत त्यांना ऑक्‍सिजनपुरवठा चालू ठेवून दुसरीकडे नेणे अशक्‍य झाले होते. याला अनेक कारणापैकी तेथे उपलब्ध असेलेली स्ट्रेचरही आहेत. एका विभागातून दुसऱ्या विभागात  रुग्ण नेण्यासाठी रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते, पण आवार खड्ड्यांनी भरलेला, त्यात साधे स्टीलचे स्ट्रेचरवरून नेणे रुग्णांसाठी जीवघेणे ठरते. 

वेस्टने आणण्यासाठीही तेच स्टेचर

हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ‘कोलॅक्‍झिबल स्ट्रेचर’ असतात, तर हॉस्पिटल आवारात पेशंटना ने-आण करण्यासाठी ‘ट्रान्स्पोर्ट पेशंट ट्रॉली’ असणे गरजेचे आहे. या ट्रॉलीना आयव्हीस्टॅंड, ऑक्‍सिजन सिलिंडरची सोय आणि रेलिंगसह हेडरिलॅक्‍स असते.  आज सीपीआरमध्ये पेशंट हालवण्यासाठी आणि मेडिकल वेस्टने ने-आण करण्यासाठी एकच स्ट्रेचर वापरले जाते.

नातेवाईक सलाईन बाटली घेऊनच पळतात

अनेकवेळा अपघात विभागातून फ्रॅक्‍चर किंवा एक्‍सरेसाठी पेशंट नेताना त्याच्या वेदनांनी सीपीआर आवार सुन्न होते. सध्यातर कोरोनाचा कहर आहे आणि याही परिस्थितीत रुग्णांना साध्या स्टील स्ट्रेचरवरुनच नेले जाते. एखाद्या रुग्णाला सलाईन लावलेले असले तरी स्ट्रेचरना  ‘आय व्ही स्टॅंड’ नसल्याने पेशंटच्या नातेवाइकांना सलाईनची बाटली हातात घेऊन स्ट्रेचरसोबत पळावे लागते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com